शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालकाची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:26 IST

ग्रामीण भागातून रुग्णांना पुढील उपचारासाठी  शहराच्या रुग्णालयात हलविण्यासाठी आपत्कालीन  रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना आपले  जीव गमवावे लागले आहे. आपत्कालीन रुग्णवाहिकेच्या  डॉक्टर व चालकांच्या मनमानीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात ये त आहेत.

ठळक मुद्देलांब मार्गाने रुग्णांना पोहोचविले जाते रुग्णालयाततक्रार केल्यास सेवा बंद करण्याच्या धमक्यालोकमत न्यूज  नेटवर्क

खेट्री : ग्रामीण भागातून रुग्णांना पुढील उपचारासाठी  शहराच्या रुग्णालयात हलविण्यासाठी आपत्कालीन  रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना आपले  जीव गमवावे लागले आहे. आपत्कालीन रुग्णवाहिकेच्या  डॉक्टर व चालकांच्या मनमानीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात ये त आहेत.अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांना त्वरित उपचार मिळावा, या  उद्देशाने शासनाने आपत्कालीन रुग्ण सेवा सुरू केलेली  आहे; परंतु आलेगाव व वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रातील रुग्ण वाहिका चतारी, खेट्री, पिंपळखुटा, चांगेफळ,  चान्नी, सायवणी, विवरा, मळसूर, शिरपूर आदी परिसरात  पाठविली जाते; परंतु या आपत्कालीन रुग्णवाहिकेवर  कार्यरत असलेले डॉक्टर व चालकाचा गेल्या काही महिन्यां पासून मनमानी कारभार सुरू असल्याचे आरोप रुग्णांच्या ना तेवाइकांकडून केला जात आहे. डॉक्टर व चालक मनमानी  करून स्वत:च्या सुविधेसाठी जवळचा मार्ग सोडून लांब  मार्गाने रुग्णवाहिका शहराच्या रुग्णालयात पोहोचवित  असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक करीत आहेत. त्यामुळे  अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर लागत  आहे. त्यामुळे रुग्णासह त्याच्या नातेवाइकामध्ये नाराजीचा  सूर उमटत आहे. १५ सप्टेंबर रोजी पांगरताटी येथील रूपेश  मधुकर गाडवे या रुग्णांनासुद्धा जवळच्या मार्गाने न नेता स्व त:च्या सुविधेसाठी लांब मार्गाने अकोला येथील रुग्णालयात  हलविण्यात आले. त्यामुळे एक तासाऐवजी अडीच तासाचा  वेळ लागला होता. 

तक्रार केल्यास सेवा बंद करण्याच्या धमक्यारुग्णवाहिकेवर असलेले डॉक्टर व चालक नेहमी किरकोळ  कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकाशी वाद घालतात आणि  तक्रार केल्यास रुग्णवाहिका सेवा बंद करण्याच्या धमक्या दे तात. त्यामुळे तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही. संबंधित  वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.

याबाबतच्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल. सदर  चौकशीत कुणी दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध निश्‍चितच  कारवाई करण्यात येईल.- डॉ. अभिजित फाटक,जिल्हा मॅनेजर आपत्कालीन रुग्ण सेवा अकोला (पुणे).