शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:17 IST

विद्यार्थ्यांना लिंक देऊन मोबाइलवरच प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.

अकोला: शहरातील शिक्षण संस्थाचालक अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध करीत असले तरी माध्यमिक शिक्षण विभागाने चौथ्या वर्षीसुद्धा अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने आॅनलाइन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लिंक देऊन मोबाइलवरच प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविणे धोक्याचे आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या अध्यक्षतेखाली व प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत आॅनलाइन अकरावी विज्ञान शाखेची प्रक्रिया राबविण्याचे निश्चित करण्यात आले. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या एकूण ८ हजार ३00 जागा आहेत. या जागांवर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दहावी टक्केवारी, स्पोर्ट कोटा, माजी सैनिक कोटा, जातीनिहाय आरक्षण लक्षात घेऊन प्रवेश दिला जाणार आहे. एका लिंकद्वारे अकोल्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्याही केंद्रावर जाण्याची गरज नसून, दिलेल्या लिंकवर घरबसल्या मोबाइलवरून अर्ज भरता येणार आहे. वेबसाइटवर महाविद्यालयांच्या शुल्काची माहिती दिली जाणार आहे.प्रवेश अर्ज भरताना, गुणपत्रिकेची झेरॉक्स, टीसी, बोनाफाइड प्रमाणपत्राची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, क्रीडा व कला नैपुण्य प्रमाणपत्र झेरॉक्स आदी कागदपत्रे लागणार आहेत. अर्ज भरताना विद्यार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीमध्ये अध्यक्ष डॉ. विजय नानोटी, सचिव गजानन चौधरी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, पुरूषोत्तम लांडे, आनंद साधू, प्रा. नरेंद्र लखाडे, प्रा. संजय देशमुख, प्रा. प्रकाश डवले, प्रा. प्रविण ढोणे, विनायक देशमुख, डॉ. साबिर कमाल, प्रा. विजय उजवणे, डॉ. जयंत बोबडे, गोपाल इंगळे, प्रा. बुंदेले, पंकज अग्रवाल यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र