शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सहा दिवसांत ३३ लाख ८० हजारांची चोरी उघड; ३९६ जणावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:30 IST

अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात कारवाईचा बडगा उगारत महावितरणच्या पथकाने जिल्ह्यात ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ३३ लाख ८० हजारांची वीज चोरी उघडकीस आणली.

ठळक मुद्देएकूण ३९६ जणांवर कारवाई करण्यात आली. ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.१६३ अभियंते, अधिकारी कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात कारवाईचा बडगा उगारत महावितरणच्या पथकाने जिल्ह्यात ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ३३ लाख ८० हजारांची वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तिनही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार ३७२ जणांवर तर कलम १२६ नुसार २४ ग्राहकांवर अशा एकूण ३९६ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागातील ६७, अकोट विभागातील ८३, तर अकोला ग्रामीण विभागातील २२२ अशा एकून ३७२ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली, यातील ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्या अकोला शहर विभागातील ०४, अकोट विभागातील ०१, तर अकोला ग्रामीण विभागातील १९ अशा एकून २४ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली.यापूवीर्सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये अनेकवेळा वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये कारवाई करण्यात आली. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा सहभागमुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या निदेर्शानुसार अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते प्रशांत दाणी (अकोला शहर), प्रमोद काकडे(अकोट) तसेच गजेंद्र गडेकर (अकोला ग्रामीण) यांचेसह विविध पथकामध्ये १६३ अभियंते, अधिकारी कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण