मालेगाव (जि. वाशिम): तालुक्यातील जोडगव्हाण येथील शेतात काम करीत असलेले शेतकरी रमेश आदमणे यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जोडगव्हाण येथील शेतकरी रमेश लक्ष्मण आदमणे हा ५0 वर्षीय शेतकरी शेतात काम करीत असताना अचानक पाऊस सुरू झाला व विजांचाही कडकडाट झाला. यावेळी रमेश लक्ष्मण आदमणे यांच्या अंगावर वीज कोसळून ते जागीच ठार झाले. ही घटना गावात समजताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव व गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली.
वीज पडून शेतक-याचा मृत्यू
By admin | Updated: April 7, 2016 01:51 IST