शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘निवडणूक साक्षरता क्लब ’ विद्यार्थ्यांना पटवून देणार मताची किंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 14:16 IST

अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यात मे अखेरपर्यंत ४२२ शाळा -महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब’ स्थापन करण्यात आले असून, या ‘क्लब’द्वारे विद्यार्थ्यांना मताची किंमत आणि महत्त्व पटवून देण्यासह मतदानासंदर्भात जाणिव -जागृतीचे काम करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशाळा-महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब ’ स्थापन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. गत २५ जानेवारीपासून अकोला जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याची मोहीम राबविण्यात आली. गत ३१ मे पर्यंत माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील ४२२ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यात मे अखेरपर्यंत ४२२ शाळा -महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब’ स्थापन करण्यात आले असून, या ‘क्लब’द्वारे विद्यार्थ्यांना मताची किंमत आणि महत्त्व पटवून देण्यासह मतदानासंदर्भात जाणिव -जागृतीचे काम करण्यात येणार आहे.नवमतदारांमध्ये निवडणूक आणि मतदानासंदर्भात जागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता क्लब ’ स्थापन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून गत २५ जानेवारीपासून अकोला जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याची मोहीम राबविण्यात आली. गत ३१ मे पर्यंत माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील ४२२ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या निवडणूक साक्षरता क्लबद्वारे शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदानासंदर्भात जागृती करण्यात येणार असून, मताची किंमत व मताचे महत्त्व पटवून देण्याचे काम करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक, मतदानासंदर्भात जाणिव जागृती निर्माण करण्यासह लोकशाही प्रक्रियेला गती देण्याच्या प्रक्रियेलाही मदत होणार आहे.निवडणूक साक्षरता क्लबचे असे आहेत उद्देश!मतदार नोंदणी तसेच नवीन मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविणे, त्यांच्यात निवडणूक संस्कृती टिकविणे ही निवडणूक साक्षरता क्लबची जबाबदारी आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची मतदार यादीत नोंदणी करणे व निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविणे, निवडणुकांमध्ये तरुण भावी मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविणे, विद्यार्थ्यांना मताची किंमत व महत्त्व समजावण्यासाठी प्रोत्साहन देणे असे निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याचे उद्देश आहेत.‘क्लब’ची माहिती पाठविली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे !अकोला जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शाळा-महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ४२२ निवडणूक साक्षरता क्लबची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे पाठविण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक