शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चार जिल्हा परिषदांची निवडणूक: न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:26 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद खंडपीठात सादर करण्याची मुदत २७ नोव्हेंबर रोजीच संपुष्टात आली.

- सदानंद सिरसाटअकोला : अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या जिल्हा परिषदांची निवडणूक घेताना राखीव जागांची संख्या ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी शासनाने तीन महिन्यांत कार्यवाही करून तसा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद खंडपीठात सादर करण्याची मुदत २७ नोव्हेंबर रोजीच संपुष्टात आली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राखीव जागांच्या तरतुदीच्या कलमात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव शासनाने ठेवल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले होते; मात्र तो प्रस्ताव अद्यापही अधिवेशनात चर्चेसाठी आलेला नाही. विशेष म्हणजे, उद्या ३० नोव्हेंबर रोजी अधिवेशनाचे सुप वाजणार आहे.महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमातील कलम १२ (२) नुसार ठरविलेले आरक्षण ५० टक्क्यांच्या अधिक होत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी राज्य सरकारला अधिनियमातील तरतुदीत आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. त्यापूर्वी २०१६ मध्ये उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविला. तो निर्णयाधीन असल्याचे सांगितले होते; मात्र त्यानंतर त्या प्रस्तावावर शासनाचा कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे अद्यापही अधिनियमातील त्याच तरतुदीनुसारच निवडणुकीत आरक्षित जागांची संख्या निश्चित केली जात आहे. दरम्यान, आता तीन महिन्यांत शासनाने काय केले, त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.

शासनाविरुद्ध आयोगाचीही याचिकानागपूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०१७ मध्येच संपुष्टात आली. तेव्हापासून जिल्हा परिषदेची निवडणूक सातत्याने पुढे ढकलली जात आहे. राज्य शासनाकडून नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अडथळे निर्माण केले जात आहेत. सुरू झालेली प्रक्रिया राज्य शासनामुळे रद्द करावी लागते, त्यानंतर नवीन राबवावी लागते. निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचेल, असे निर्णय शासनाने घेऊ नये, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही बजावलेली आहे. त्यामुळे आता नागपूरसह चार जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत शासनाने केलेली कार्यवाही न्यायालयातच सांगावी लागणार आहे. 

शासनाची भूमिका संदिग्धएकीकडे विधिमंडळात प्रस्तावावर चर्चा झाली नाही. त्याचवेळी चार जिल्हा परिषदांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. मुदतीनंतरच्या काळात जिल्हा परिषदेचा कारभार कोण पाहणार, यावर शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देणे, प्रशासक नेमणे यावर शासन कोणता निर्णय घेईल, याबाबत सध्यातरी संदिग्धता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूकHigh Courtउच्च न्यायालय