शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भूमी अभिलेख कर्मचार्‍यांचे पोलिसांनी नोंदविले बयाण! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:15 IST

अकोला : संतोषी माता मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीचा असलेला तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कागदोपत्री हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात बुधवारी भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन व आताच्या कर्मचार्‍यांना ठाण्यात बोलावून त्यांचे  बयाण नोंदविले. चार कर्मचार्‍यांचे बयाण नोंदविल्यानंतर आता तत्कालीन अधिकारीही या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देभूखंड हडपण्याचे प्रकरण चार कर्मचार्‍यांची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पेशी गजराज मारवाडीच्या हयात असण्यावर प्रश्नचिन्ह

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संतोषी माता मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीचा असलेला तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कागदोपत्री हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात बुधवारी भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन व आताच्या कर्मचार्‍यांना ठाण्यात बोलावून त्यांचे  बयाण नोंदविले. चार कर्मचार्‍यांचे बयाण नोंदविल्यानंतर आता तत्कालीन अधिकारीही या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिराच्या पाठीमागील भागात (माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर) मोठे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून २0 कोटी रुपये किमतीचा ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर म्हणजेच तब्बल ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंडाची कोणतेही हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुडदमल मारवाडी यांच्या नावाने हा भूखंड असल्याची संगणकीकृत खोटी नोंद घेण्यात आली आहे.  त्यानंतर अशाच प्रकारच्या बनावट दस्तावेजाद्वारे खोटे मालमत्ता पत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानंतर या जागेचे फ ेरफार व अन्य दस्तावेजही बनावट तयार करून, त्याची विक्री करण्याच्या हालचाली सुरू होताच, या प्रकरणाची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. सदर प्रकरणाचे दस्तावेज ‘लोकमत’च्या हाती येताच, या प्रकरणाला वाचा फोडली. तसेच पोलिसांनीही भूमी अभिलेख कार्यालयाकडून दस्तावेज व त्यांचा अहवाल मागविला. सदर अहवाल प्राप्त झाला असून, त्यानंतर बुधवारी सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी या प्रकरणातील चार कर्मचार्‍यांचे बयाण नोंदविले आहे. सदर भूखंड गजराज मारवाडी यांच्या नावावर करण्यासाठी येथील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मिलीभगत असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

गजराज मारवाडीच्या हयात असण्यावर प्रश्नचिन्ह‘लोकमत’च्या वृत्तानंतर सदर प्रकरण चांगलेच पेटले. त्यानंतर पोलिसांनी गजराज गुदडमल मारवाडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिटी कोतवाली पोलिसांनी अशा नावाचा व्यक्ती अद्यापपर्यंत आढळला नाही. हा व्यक्ती हयात आहे की नाही, या संदर्भात संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे हा भूखंड हडपण्यासाठी ज्या गजराज मारवाडीचे नाव व दस्तावेज वापरण्यात आले, त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भुखंड प्रकरणाच्या चौकशीचे आदेश भूमि अभिलेख विभागाला देण्यात आले आहेत. चौकशी करुन दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. - संजय खडसे प्रभारी उपविभागीय अधिकारी, अकोला