शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

वयाेवृद्ध नागरिक भर उन्हात ताटकळत; पिण्यासाठी पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 10:34 AM

CoronaVaccination in Akola लसीकरण केंद्रात गेलेल्या वयाेवृद्ध नागरिकांना भर उन्हात तासन् तास ताटकळत उभे राहावे लागले.

- आशिष गावंडे

अकाेला : काेराेना रुग्णांच्या वाढत्या संख्येला अटकाव घालण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यादरम्यान, महापालिकेच्या लसीकरण केंद्रात गेलेल्या वयाेवृद्ध नागरिकांना भर उन्हात तासन् तास ताटकळत उभे राहावे लागले. त्यांना बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची मनपा प्रशासनाने काेणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे वयाेवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले.

संसर्गजन्य काेराेना विषाणूचा सर्वाधिक धाेका वयाेवृद्ध नागरिकांना आहे. यातही असाध्य व्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्यास ते उपचारांना तातडीने प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळेच देशात काेराेनाचा शिरकाव झाल्यानंतर वयाेवृद्ध नागरिकांचा मृत्युदर जास्त असल्याचे समाेर आले. दरम्यान, काेराेनाला अटकाव घालण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाेवृद्ध नागरिकांना लस देण्याच्या माेहिमेला महापालिका प्रशासनाने प्रारंभ केला आहे. यामध्ये शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपाचे किसनीबाई भरतिया रुग्णालय, कस्तुरबा गांधी रुग्णालय, हरिहरपेठ येथील नागरी आराेग्य केंद्र व सिंधी कॅम्प येथील नागरी आराेग्य केंद्रामार्फत खडकी येथे तत्कालीन ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मनपाने वयाेवृद्ध नागरिकांच्या बसण्याची व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित हाेते. या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता केली नसल्याने नागरिकांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे चित्र समाेर आले.

 

वयाेवृद्ध नागरिक सावलीच्या शाेधात

मनपाच्या किसनीबाई भरतिया रुग्णालय, हरिहर पेठ येथील नागरी आराेग्य केंद्र व खडकी येथे वयाेवृद्ध महिला व पुरुषांना भर उन्हात उभे राहावे लागले. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेक नागरिक भिंतीच्या आडोशाला उभे हाेते. तर काही नागरिक ऑटाेमध्ये बसून हाेते.

 

कस्तुरबा रुग्णालयात पाण्याचा अभाव

जुन्या शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उन्हाची समस्या नसली तरी ज्येष्ठ नागरिकांना आवारात बसण्यासाठी खुर्च्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. लस दिल्यानंतर रुग्णालयात बेंच व खाटांची व्यवस्था दिसून आली. परंतु एकाच बेंचवर अनेक व्यक्तींना दाटीने बसावे लागल्याचे पाहावयास मिळाले.

 

लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील.

- डाॅ.अस्मिता पाठक, प्रभारी वैद्यकीय अधिकारी मनपा

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला