शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

मोर्णेचा श्‍वास मोकळा : नदीच्या स्वच्छतेसाठी एकवटले अकोलेकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 1:29 AM

अकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवारी राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या  ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’मध्ये  नदीपात्राच्या दोन्ही काठावर नागरिकांची गर्दी उसळल्याने, मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकर एकवटल्याचा प्रत्यय आला.

ठळक मुद्देपालकमंत्री, खासदारांनी उचलली टोपली!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवारी राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या  ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’मध्ये  नदीपात्राच्या दोन्ही काठावर नागरिकांची गर्दी उसळल्याने, मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकर एकवटल्याचा प्रत्यय आला.

मोर्णा नदी अकोला शहराचे वैभव आहे; परंतु मोर्णा नदीपात्रात जलकुंभी मोठय़ा प्रमाणात वाढली असून, घाण कचरा साचला आहे. शहरातील  सांडपाणी नदीत जात असल्याने, मोर्णा नदीत अस्वच्छता पसरली आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना व मनपा अंतर्गत सफाई कर्मचार्‍यांसह लोकसहभागातून १३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ८.३0 वाजता लक्झरी बस स्टॅन्ड जवळील गणेश घाट येथे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. हरीश पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या उपस्थितीत ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला प्रारंभ करण्यात आला. सिटी कोतवाली ते जेतवन नगरदरम्यान १४ ठिकाणी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मोर्णा नदी स्वच्छतेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, सेवाभावी संस्था व संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांची मोर्णा नदीच्या दोन्ही काठावर गर्दी उसळली होती. नदीपात्रातील जलकुंभी आणि गाळ काढण्याच्या मोहिमेत शहरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी  अकोलेकर एकवटल्याचा प्रत्यय आला.

पालकमंत्री, खासदारांनी उचलली टोपली!

  • - मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मोठय़ा उत्साहात सहभाग घेतल्याचे दिसून आले. सकाळी ८ वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. 
  • - हातमोजे, तोंडाला मास्क बांधून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल यांसह लोकप्रतिनिधींनी अक्षरश: नदीपात्रात उतरून जलकुंभी व कचर्‍याने भरलेली टोपली उचलल्याचे पहावयास मिळाले. मोर्णा नदी स्वच्छतेच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी एकवटल्याचे चित्र दिसून आले. मंकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला अकोलेकरांसाठी विकासाचे हे चांगले संकेत मानले जात आहे.

सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग; मोहिमेला बळ! मोर्णा नदीची स्वच्छता लोकसहभागातून करण्याच्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला. यामध्ये अखिल भारतीय मराठी परिषदेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मिर, रेड क्रॉस इंडियन सोसायटीचे प्रभजितसिंग बछेर, सीताबाई कला महाविद्यालयाचे प्रा. प्रसन्नजित गवई व एनएसयूआयचे विद्यार्थी, कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया, मारवाडी युवा मंचचे राम बाहेती, ‘सीए’ इंस्टिट्यूटचे घनश्याम चांडक, खाद्यपेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह अनेक संघटनांचा सक्रिय सहभाग होता. 

टॅग्स :Morna Riverमोरणा नदीMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमAkola cityअकोला शहर