शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी आठ हजार अर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:04 IST

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील महिलांकडून आठ हजार अर्ज गत १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले

ठळक मुद्देजिल्ह्यातील महिलांकडून १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत आठ हजार अर्ज प्राप्त झाले.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाला माहिती देण्यात आली.

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील महिलांकडून आठ हजार अर्ज गत १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.राज्यातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे अर्ज सादर करण्याकरिता गत महिनाभराच्या कालावधीत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. प्रती महिना चार हजार रुपये अर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा मागणीचे मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत स्वीकारण्यात आले; परंतु महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना शासनामार्फत राबविण्यात येत नसताना, तसेच यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश किंवा निर्देश नसल्याने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मागणीचे अर्ज स्वीकारणे गत १ आॅगस्टपासून बंद करण्यात आले. जिल्ह्यातील महिलांकडून १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत आठ हजार अर्ज प्राप्त झाले असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाला माहिती देण्यात आली. तसेच प्राप्त झालेल्या अर्जासंदर्भात मार्गदर्शनही मागविण्यात आले आहे.महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे आठ हजार अर्ज महिलांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. यासंदर्भात मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाकडे माहिती देण्यात आली असून, मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.-श्रीकांत देशपांडेनिवासी उप जिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय