शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

‘स्थायी’चे आठ सदस्य होणार पायउतार; आज विशेष सभा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:47 IST

अकोला : महापालिकेतील स्थायी समितीच्या गठनाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. नियमानुसार एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्थायीमधील १६ सदस्यांपैकी आठ सदस्यांना नवृत्त व्हावे लागते. त्यासाठी ईश्‍वर चिठ्ठी काढली जाणार असून, उद्या मंगळवारी स्थायी समिती सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देएक वर्षाचा कालावधी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील स्थायी समितीच्या गठनाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. नियमानुसार एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्थायीमधील १६ सदस्यांपैकी आठ सदस्यांना नवृत्त व्हावे लागते. त्यासाठी ईश्‍वर चिठ्ठी काढली जाणार असून, उद्या मंगळवारी स्थायी समिती सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाला भरभरून मतांचे दान दिले. निवडणुकीच्या निकालाअंती २३ फेब्रुवारी २0१७ रोजी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने महापालिकेची सत्ता मिळवली. मार्च महिन्यात महापौर, उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन करण्यात आले. यामध्ये भाजपाच्यावतीने बाळ टाले, माजी महापौर सुमनताई गावंडे, योगिता पावसाळे, सुजाता अहिर, हरीश आलीमचंदानी, सुनील क्षीरसागर, अजय शर्मा, विशाल इंगळे, पल्लवी मोरे, माधुरी बडोणे यांना संधी देण्यात आली. काँग्रेसकडून अँड. इक्बाल सिद्दीकी, पराग कांबळे, राकाँचे फै याज खान, शिवसेनेकडून राजेश मिश्रा, सपना नवले, एमआयएमचे मोहम्मद मुस्तफा यांची वर्णी लागली होती. स्थायी समिती सदस्यांची निवड केल्यानंतर मार्च २0१७ मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक बाळ टाले यांची निवड करण्यात आली होती. मनपाच्या नियमानुसार स्थायी समितीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यास १६ पैकी आठ सदस्यांना ईश्‍वर चिठ्ठीद्वारे नवृत्त करावे लागते. त्यासाठी २0 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ईश्‍वर चिठ्ठीद्वारे स्थायीमधील कोणत्या आठ सदस्यांना नवृत्त व्हावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सदस्यांमध्ये धाकधूक!महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम २0 (३) व (४) अन्वये ईश्‍वर चिठ्ठीद्वारे आठ सदस्यांना नवृत्त करावे लागते. या आठ सदस्यांमध्ये आपला समावेश आहे का, या विचाराने स्थायी समिती सदस्यांमध्ये धाकधूक वाढल्याचे बोलल्या जात आहे.  

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका