शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’च्या प्रत्येक व्यवहारातून मिळाले आठशे रुपये कमी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:20 IST

अकोला : एटीएम च्या कॅसेटमध्ये बिघाड झाल्याने  प्रत्येक ग्राहकाच्या व्यवहारातील आठशे रुपये गिळंकृत केले. ही घटना सोमवारी सायंकाळी तुकाराम चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये घडली. एका पाठोपाठ एक ग्राहकाला आठशे रुपये कमी येत असल्याने अनेकांना धक्का बसला. ही बाब बँकेच्या अधिकार्‍यांना कळताच त्यांनी तातडीने एटीएम सेवा सायंकाळी बंद केली.

ठळक मुद्दे‘एचडीएफसी’ बँकेत ग्राहकांची धाव ‘कॅसेट’मध्ये बिघाड झाल्याने गोंधळ 

अकोला : एटीएम च्या कॅसेटमध्ये बिघाड झाल्याने  प्रत्येक ग्राहकाच्या व्यवहारातील आठशे रुपये गिळंकृत केले. ही घटना सोमवारी सायंकाळी तुकाराम चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये घडली. एका पाठोपाठ एक ग्राहकाला आठशे रुपये कमी येत असल्याने अनेकांना धक्का बसला. ही बाब बँकेच्या अधिकार्‍यांना कळताच त्यांनी तातडीने एटीएम सेवा सायंकाळी बंद केली.तुकाराम चौकातील एचडीएफसीच्या एटीएमवर सोमवारी सायंकाळी आधी एका ग्राहकाने काही रक्कम काढली. त्या व्यक्तीला स्लिपवर हिशेब व्यवस्थित दिसत असला तरी आठशे रुपये कमी आले. हा व्यक्ती विचार करीत असताना एटीएमवरून व्यवहार करणार्‍या दुसर्‍या व्यक्तीलाही तोच अनुभव आला. असाच अनुभव लागोपाठ आठ जणांना आला. ज्याने एक हजार रुपये काढले त्याचे हाती केवळ दोनशे रुपये आल्याने मात्र येथील वातावरण तापले. एटीएमच्या सिक्युरिटीवर या ग्राहकांनी धाव घेतली. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून घडत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हे एटीएम तातडीने शटर ओढून बंद करण्यात आले. नोटा मोजणीच्या कॅसेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एटीएमने लागोपाठ आठशे रुपये गिळल्याचे तपासात समोर आले. आता ज्यांनी तक्रार केली त्यांचे आठशे रुपये संबंधित बँकेच्या खात्यात वळते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा तांत्रिक बिघाड आहे. एटीएममधील व्यवहाराची नोंद ऑनलाइन आणि प्रीन्टद्वारे ऑटोमॅटिक होत असते. ज्या व्यक्तींनी तक्रार केली आहे, त्यांची रक्कम खात्यात वळती केली जाईल. मात्र, ज्यांनी तक्रार केली नाही, त्यांची रक्कम सिस्टीममध्ये पडून राहील, असा प्रकार घडल्यास ग्राहकांनी तातडीने संपर्क साधवा.-नरेंद्र अंबुसकर, उप व्यवस्थापक, एचडीएफसी बँक अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाatmएटीएम