शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या मुलांपर्यंत अंडे पोहोचलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 12:34 IST

अकोला: दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आदिवासीबहुल परिसरातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

अकोला: दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आदिवासीबहुल परिसरातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. ‘स्वयंम’ प्रकल्पांतर्गत शासनाने लहान मुलांच्या आहारात अंड्यांचा समावेश करणे व स्वयंरोजगार निर्मितीसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करून ५ कोटी ६० लक्षचा निधी वितरित केला असता, अंगणवाडीच्या मुलांपर्यंत अंडे पोहोचलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेच अमरावती विभागातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतील अनागोंदी कारभार पाहता या प्रकरणाची चौकशी होण्याचे संकेत आहेत.दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या कुपोषणाला आळा बसावा, आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशातून शासनाने स्वयंम प्रकल्पाच्या माध्यमातून कुक्कुटपालन, स्वयंरोजगार निर्मिती तसेच अंगणवाडीतील लहान मुलांच्या पोषक आहारासाठी निधीची तरतूद केली. २०१८-१९ आर्थिक वर्षांमध्ये ८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ५ कोटी ६० लक्षच्या निधीतून आदिवासींना लाभ देण्याचा प्रयत्न झाला असता, त्यात अनेक उणिवा असल्याचे चित्र समोर आले. अंगणवाडीतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करण्याचा समावेश होता. राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेच अमरावती विभागातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील मुलांपर्यंत पुरेशा प्रमाणात अंड्यांचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. असे असताना या विभागामार्फत पुन्हा २ कोटी ४० लक्षचा निधी वितरित करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागातील संबंधित क र्मचारी, पुरवठादार यांचे साटेलोटे लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा