शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांसाठी राखेपासून वीट उद्योग उभारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 15:16 IST

अकोला: ग्रामीण भागात महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी राखेपासून वीट निर्मिती प्रकल्प निर्मितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडून मागविला आहे.

अकोला: ग्रामीण भागात महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी राखेपासून वीट निर्मिती प्रकल्प निर्मितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडून मागविला आहे. अहवालानंतर सुरुवातीला पाच महिला बचत गटांसाठी हा उपक्रम सुरू होण्याची चिन्हे आहेत.ग्रामविकास विभागाने १९९९ पासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी देशातील प्रगत तंत्रज्ञान सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना रोजगार देणे, प्रतिमाह दोन हजार रुपयांपर्यंत त्यांचे उत्पादन व्हावे, यासाठी स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना राबविण्यात आली. त्यासाठी बचत गटांना कर्जही देण्यात आले. त्यानंतर त्या बचत गटांचे किती उद्योग सुरू आहेत, या बाबीची माहिती सध्यातरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे नाही.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील महिलांना रोजगारासाठी विशेष उपक्रम राबविण्याची संकल्पना सुचविली. त्यासाठी ग्रामीण भागातील १८ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांचा बचत गटांमध्ये समावेश करण्याची मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

- ग्रामीण विकास यंत्रणा देणार अहवाल!राखेपासून वीट तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियोजन करणार आहे. त्यासाठीचा अहवाल ५ जूनपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

- प्रक्रिया केंद्र निर्मितीचीही तयारीबचत गटांच्या महिलांना रोजगार मिळण्यासाठी वार्षिक नियोजन केले जाणार आहे. त्यामध्ये बचत गटांचा ब्रँड तयार करणे, किरकोळ विक्री दुकान, आॅनलाइन दुकान, गोदाम, प्रक्रिया केंद्र तयार करणे यासारखे उपक्रमही राबविले जाणार आहेत.

- वस्तू विक्रीसाठी केंद्र व बाजारपेठही आवश्यकस्वरोजगारातून तयार झालेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रत्येक विभाग, जिल्हा पातळीवर विक्री प्रदर्शने आयोजित करणे, प्रत्येक जिल्हा, तालुका ठिकाणी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याला मंत्रिमंडळाच्या १८ सप्टेंबर २००८ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी निधीही देण्यात आला. त्याशिवाय, दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात १० लाख रुपये खर्च करून वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी निधी दिला जातो. विभाग स्तरावर हा निधी ३५ लाख रुपये दिला जातो. राज्यात दरवर्षी ४ कोटी ९० लाख रुपये त्यासाठी खर्च होतात. त्यातून बचत गटांच्या महिलांच्या हातात किती रोजगार पडते, याचा शोध घेण्याचीही वेळ आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद