शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

शिक्षक भरतीसाठी प्रथम द्यावी लागेल शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:14 IST

अकोला: खासगी शिक्षण संस्थांमध्ये रिक्त जागांवर शिक्षकाची नेमणूक करायची असेल तर शिक्षण संस्थेला शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन प्रथमत: शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी लागणार आहे.

ठळक मुद्दे खासगी शिक्षण संस्था शाळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पुढाकार घेत असताना, त्यावरही शिक्षण विभाग निर्बंध लादत आहेत. वृत्तपत्रात जाहिरात देण्याऐवजी प्रथम शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी, असा अजब निर्णय घेतला आहे . रिक्त पदांची माहिती मिळणार तरी कशी, असा सवाल डीएड्, बीएड् शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

- नितीन गव्हाळे

अकोला: खासगी शिक्षण संस्थांमध्ये रिक्त जागांवर शिक्षकाची नेमणूक करायची असेल तर शिक्षण संस्थेला शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन प्रथमत: शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी लागणार आहे. वृत्तपत्रात जाहिरात देणे बंधनकारक नाही. आवश्यक असेल तर त्यांनी जाहिरात द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता शिक्षक भरतीबाबत शासनाने निर्णय घेतल्यामुळे बेरोजगार उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत. २0१0 पासून शासनाने शिक्षक भरती करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे बेरोजगार डीएड्, बीएड् शिक्षकांची संख्या वाढली आहे, तसेच शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक पदासाठी शासनाने टीईटी व अभियोग्यता चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. गत दोन वर्षांमध्ये हजारो बेरोजगार कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क भरून शिक्षकांनी टीईटी व अभियोग्यता चाचणी(अ‍ॅप्टीट्युड) दिली; परंतु शासन शिक्षक भरतीच घेत नसल्यामुळे हजारो शिक्षक बेकार झाले आहेत. खासगी शिक्षण संस्था शाळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पुढाकार घेत असताना, त्यावरही शिक्षण विभाग निर्बंध लादत आहेत. भरती बंदी काळात नोकरीवर लागलेल्या राज्यातील शेकडो शिक्षकांना शासनाने घरचा रस्ता दाखविला. आताही शासनाने खासगी शिक्षण संस्थांना शिक्षकांची नेमणूक करायची असेल तर शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाºयांची परवानगी घेऊन वृत्तपत्रात जाहिरात देण्याऐवजी प्रथम शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी, असा अजब निर्णय घेतला आहे आणि वृत्तपत्रात जाहिरात दिलीच पाहिजे, असे नाही, असेही म्हटले आहे. वृत्तापत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून हजारो बेरोजगार शिक्षकांना कोणत्या शाळेत किती रिक्त जागा, त्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती, मुलाखतीची तारीख व वेळ कळते. शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवरील जाहिरात पाहणार तरी कोण? आणि आम्हाला रिक्त पदांची माहिती मिळणार तरी कशी, असा सवाल डीएड्, बीएड् शिक्षकांनी उपस्थित केला आहे.आॅनलाइन अर्ज मागविले जातीलखासगी शिक्षण संस्थांनी रिक्त जागा भरण्यासाठी काढलेली जाहिरात प्रथम शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर टाकावी. त्यानंतर बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात येतील. पात्रताधारक उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. सर्वाधिक गुणवत्तेनुसार आवश्यक उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती करणे संबंधित संस्थांना बंधनकारक राहील.

पुण्यात झाले अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणशिक्षक भरतीसंदर्भात १८ व १९ जून रोजी पुणे येथे राज्यातील शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाºयांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये अधिकाºयांना शिक्षक भरती आणि त्याबद्दलच्या नियमावलीची माहिती देण्यात आल्याची माहिती आहे.

शिक्षक भरतीसाठी शिक्षण संस्थांना शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात द्यावी लागणार आहे. यातून वृत्तपत्रांना वगळण्यात आले नाही. शिक्षण संस्थांना वृत्तपत्रांमध्येसुद्धा जाहिरात द्यावी लागणार आहे. यासंदर्भात पुण्याला प्रशिक्षण होणार आहे.चंदनसिंग राठोड, शिक्षण उपसंचालकअमरावती विभाग.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक