शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

सोयाबीनच्या आवकअभावी ५ ते ८ रुपयांनी वधारले खाद्यतेलाचे भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:55 IST

आगामी आठ दिवसांत आणखी तीन रुपयांची भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे.

- संजय खांडेकरअकोला : गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि इतर तेलबिया वाणाची आवक कमी असल्याने पंधरा दिवसांत तब्बल ५ ते ८ रुपयांनी खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. भाववाढीचा हा आलेख कायम राहणार असून, आगामी आठ दिवसांत आणखी तीन रुपयांची भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. उशिराने आलेल्या अतिवृष्टीचा फटका आता सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे.दरवर्षी भारतीयांना जेवढे खाद्यतेल लागते, त्यातील ७० टक्के खाद्यतेल आयात होते. देशात केवळ ३० टक्के खाद्यतेल निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या तेलात सोयाबीन आणि पामचा समावेश आहे. देशात सोयाबीनचा पेरा जास्त असला तरी सोयाबीनवर प्रक्रिया करून खाद्यतेल काढणारे उद्योग कमी आहेत. त्यातही यंदा उशिरा अन् अतिशय पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. काही प्रमाणात सोयाबीन आले; मात्र त्यात दर्जा राहिलेला नाही. त्यामुळे ४,००० रुपये प्रतिक्विंटलच्या पलीकडे सोयाबीनला भाव नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती, एनसीडीईएक्स आणि खासगी व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची आवक सुरूच असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ही आवक अत्यल्प आहे. सोयाबीनच्या आवकअभावी आता खाद्यतेलाचे भाव वधारत आहेत. असे झाले भाव...खाद्यतेलाच्या दराचा आलेख सातत्याने उंचावर सरकत जात आहे. पाम तेलामध्ये प्रतिकिलो मागे सात रुपये, वनस्पती तेलामध्ये प्रतिकिलो मागे सहा रुपये आणि सोयाबीन तेलामध्ये प्रतिकिलो मागे आठ रुपये वाढले आहेत. येत्या आठ दिवसांत आणखी तीन रुपयांनी ही भाववाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या धोरणाकडे लक्षखाद्यतेलाची आयात करण्याऐवजी यंदा तेलबियांची आयात करण्याचे सरकारचे धोरण ठरत आहे. देशातील जवळपास ४०० उद्योजकांना तेल निर्मितीसोबतच अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. असे जर झाले तर खाद्यतेलाचे भाव आटोक्यात राहण्याची शक्यता आहे.

 सोयाबीन उत्पादनाचा फटका यंदा सर्वांनाच जाणवणार आहे. विदेशात सोयाबीन आणि डीओसीचे भाव आटोक्यात असल्याने तरी भाव ठीक आहे. जर विदेशात सोयाबीनचे भाव वधारले, तर यापेक्षा जास्त दराने खाद्यतेल विकत घेण्याची वेळ येऊ शकते.-वसंत बाछुका, उद्योजक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीMarketबाजार