नायगाव येथे ताजुद्दीन बाबा जयंती
अकाेला : भाजप अल्पसंख्याक माेर्चाचावतीने नायगाव येथील संजय नगर शहीद अब्दुल हमीद चाैक येथे ताजुद्दिन बाबा यांची जयंती माेठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप अल्पसंख्याक माेर्चाचे शहराध्यक्ष जसमितसिंग ओबेराॅय, शितल जैन यांसह उपस्थित हाेते. यावेळी नायगाव, संजयनगर परिसरातील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
तालुक्यात संविधान स्तंभ उभारा!
अकाेला : भारतीय संविधानाची निर्मिती भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असून प्रत्येक भारतीयाने न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. संविधानाचे महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभाची उभारणी करण्याची मागणी काँग्रेस कमिटी ग्रामीण अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गायकवाड यांनी केली आहे.
स्काऊट गाइड अभियानास प्रतिसाद
अकाेला : तालुकास्तरीय शहरी व ग्रामीण स्काउट गाइड नाेंदणी अभियानअंतर्गत २९ जानेवारी राेजी स्थानिक अकाेला भारत स्काउट आणि कार्यालय अकाेला येथे नाेंदणी शिबिर घेण्यात आले. यावेळी शिबिराला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शहरासह सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांची माेठी उपस्थिती हाेती.
साेशल डिस्टन्सिंगचा विसर
अकाेला : काेराेनावर मात करण्यासाठी लसीकरण माेहिमेला सुरुवात झाली असून हा संसर्ग आटाेक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. तरीही मागील काही दिवसांपासून काेराेनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असताना नागरिक साेशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
सिमेंट रस्त्यांच्या मध्यात विद्युत खांब
अकाेला : शहरातील टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कपर्यंत सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. या मार्गाला अडथळा ठरणारे विद्युत खांब व राेहित्र हटविणे गरजेचे असताना याकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या खांबांमुळे वाहनचालकांचा अपघात हाेण्याची दाट शक्यता आहे.
श्रीराम द्वारसमाेर रस्त्यात अतिक्रमण
अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकपर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लास्टिक विक्रेत्यांसह फळविक्रेत्यांनी अतिक्रमण उभारले आहे. चक्क रस्त्यात साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे या मार्गावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. यामुळे अकाेलेकर त्रस्त असताना मनपाकडून कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे.
रस्त्याचे निकृष्ट डांबरीकरण
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये गजानननगर ते राधिका ऑइल मिलपर्यंतच्या डांबरी रस्त्याचे रुंदीकरण निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याचा आराेप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. रस्त्यावर साचलेल्या मातीवर डांबराचा थर अंथरण्यात आला असून या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. भाजप नगरसेवकांनी या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.