शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

सर्वकाही खा, पण खाण्यावर नियंत्रण असू द्या - डॉ. जगन्नाथ दीक्षित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:14 IST

र्व काही खा; परंतु खाण्यावर नियंत्रण ठेवा, बकाबका खाऊ नका, दिवसातून दोन वेळा खा, योगा, व्यायाम आणि पायी फिरण्याकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी अकोलेकरांना दिला.

ठळक मुद्देप्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध विषयावर डॉ. दीक्षित बोलत होते. दोन भोजनाच्या मधात काही खाऊ नका आणि भोजनात गोड कमी खा, भोजनात प्रोटिन्स वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक डॉ. जुगल चिराणिया यांनी तर परिचय आयएमएचे सचिव डॉ. अजयसिंह चौहान यांनी करून दिला.

अकोला: सध्या अनेकांसमोर वाढते वजन, मधुमेहाचा मोठा प्रश्न आहे. वजन वाढले. मधुमेह वाढला. आता त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, वजन कसे कमी करावे, या चिंता माणसाला सतावतात. वजन आणि मधुमेह यापासून दूर राहायचे असेल, तर सर्व काही खा; परंतु खाण्यावर नियंत्रण ठेवा, बकाबका खाऊ नका, दिवसातून दोन वेळा खा, योगा, व्यायाम आणि पायी फिरण्याकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी अकोलेकरांना दिला.आयएमए, अग्रवाल समिती, माहेश्वरी समाज ट्रस्ट, रोटरी परिवारच्यावतीने रविवारी दुपारी ४ वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध विषयावर डॉ. दीक्षित बोलत होते. यावेळी मंचावर आयएमएच्या डॉ. अनिता खंडेलवाल, रोटरीचे सहायक प्रांतपाल दीपक गोयनका, अग्रवाल समितीचे सहसचिव अ‍ॅड. सुरेश अग्रवाल, माहेश्वरी समाज ट्रस्टचे डॉ. संदीप चांडक आदी होते.डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, वजन का वाढत आहे, याचा विचार करा. मुले सर्रास कोल्ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा खाताना दिसतात. वय, लिंग, आनुवंशिक घटक, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, मेहनतीचा अभाव, भोजन बनविण्याची पद्धती, शिक्षण, हार्मोन्स, मद्यपान, धूम्रपान, वंश आदी वजन वाढण्याची कारणे आहेत. अनेकांना वजन कमी करायचे असते; परंतु त्यासाठी शारीरिक श्रम अनेकांना नको असतात. त्यांना शॉर्टकट पद्धत हवी असते. वजन कमी करायचे असेल, तर एक दिवस उपवास करा, रात्री केवळ फळ खा, रसाहार, निराहार करा, दर तीन तासांनी थोडेथोडे खा, तसेच आयुर्वेदिक, होमिओपॅथीची औषधे घ्या, असे सांगत, डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, की खाण्यासाठी जीवन जगू नका, तर जगण्यासाठी खा...जे काही खायचे आहे, ते खा; परंतु दिवसातून दोन वेळा खा, तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीरात इन्सुलिन निर्माण होते. वजन आणि मधुमेहाला प्रतिबंध करायचा असेल, तर खूप भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा, भोजनाची वेळ निश्चित करा आणि त्याच वेळेत भोजन करा, तसेच ५५ मिनिटांमध्ये भोजन संपवा, असे सांगत त्यांनी दोन भोजनाच्या मधात काही खाऊ नका आणि भोजनात गोड कमी खा, भोजनात प्रोटिन्स वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक डॉ. जुगल चिराणिया यांनी तर परिचय आयएमएचे सचिव डॉ. अजयसिंह चौहान यांनी करून दिला. आभार राजीव बजाज यांनी मानले.

खासदार, महापौरांची कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थितीडॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या कार्यक्रमाला खासदार संजय धोत्रे, सुहासिनी धोत्रे, महापौर विजय अग्रवाल यांनीही हजेरी लावली. प्रारंभी त्यांनी डॉ. दीक्षित यांचे स्वागत केले. त्यानंतर खासदार धोत्रे, महापौर अग्रवाल यांनी पूर्णवेळ नागरिकांमध्ये बसून डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान ऐकले.

 

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टरPramilatai Oke Hallप्रमिलाताई ओक हॉल