शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष गाड्यांद्वारे अकोला स्थानकाला केवळ ६० हजारांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 11:12 IST

विद्यार्थ्यांसाठी मध्य रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांद्वारे अकोला स्थानकाला केवळ ६० हजार रुपयांची कमाई झाल्याचे समोर आले आहे.

अकोला : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व नौदल अकादमी (एनए)च्या रविवार, ६ सप्टेंबर रोजी राज्यातील मुंबई व नागपूरसह मोठ्या शहरांमध्ये पार पडलेल्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्य रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांद्वारे अकोला स्थानकाला केवळ ६० हजार रुपयांची कमाई झाल्याचे समोर आले आहे.एनडीए व एनएच्या परीक्षांमध्ये सहभागी होणाºया विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांपर्यंत जाण्यासाठी मध्य रेल्वेने ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत अप व डाउन अशा २३ विशेष गाड्या चालविल्या. यापैकी आठ गाड्या अकोला स्थानकावरून गेल्या. यामध्ये अकोला ते नागपूर ही मेमू गाडी रविवारी रात्री रवाना झाली होती. या सर्व गाड्या परतीच्या प्रवासातही अकोला स्थानकावरून गेल्या. या आठ गाड्यांच्या आवागमनातून अकोला रेल्वेस्थानकाला मात्र विशेष नफा झाला नसल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात आलेल्या या गाड्यांमधून अकोला रेल्वेस्थानकाला फक्त ६० हजार रुपयांची कमाई झाली. कमाईच्या बाबतीत भुसावळ रेल्वे मंडळाच्या इतर स्थानकांवरही हीच स्थिती असल्याची माहिती आहे. यावरून परिक्षार्थ्यांनी या विशेष रेल्वगाड्यांकडे पाठ करून खासगी गाड्यांचा आधार घेतल्याचे स्पष्ट होत आहे. एकंदरित या विशेष गाड्यांमधून मध्य रेल्वेला अपेक्षित कमाई झाली नसल्याचे चित्र आहे.अशी झाली कमाईअकोला ते नागपूर या मेमू गाडीच्या ६४ अनारक्षित तिकिटांची विक्री झाली. याद्वारे अकोला स्थानकाला फक्त ६ हजार रुपये मिळाले. अकोल्याहून मुंबईला गेलेल्या ११५ परीक्षार्थ्यांनी आरक्षित तिकीट खरेदी केले. यामधून रेल्वेच्या तिजोरीत जवळपास ४३ हजारांची भर पडली. अकोल्याहून नागपूरला गेलेल्या ५६ परीक्षार्थ्यांनी आरक्षित तिकीट घेतले. याद्वारे अकोला स्थानकाला ११ हजार रुपये मिळाल्याची माहिती आहे.ऐनवेळी मिळाली माहिती६ सप्टेंबर रोजीच्या परीक्षांसाठी विशेष गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेकांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही. शिवाय अनारक्षित तिकिटांची विक्रीही ४ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी तिकीट खरेदीत स्वारस्य दाखविले नाही.

 

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकcentral railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे