शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारांपेक्षा अधिक खरेदीसाठी आता ई-कोटेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:16 IST

यापुढे आता २० हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीसाठी ई-कोटेशन पद्धती राबवण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिला.

अकोला: जिल्हा परिषदेच्या खरेदी प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांच्या पृष्ठभूमीवर यापुढे आता २० हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीसाठी ई-कोटेशन पद्धती राबवण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिला.जिल्हा परिषदेत कुरघोडीच्या राजकारणाचा फटका विकास कामांना बसत आहे. सत्ताधारी व विरोेधकांमधील अंतर्गत राजकारणामुळे विकास कामांचे अनेक ठराव मंजूरच होत नाहीत. जिल्हा परिषदेकडून अनेकदा साहित्य खरेदी करण्यात येते. अनेकदा ही प्रक्रियाही विशिष्ट हेतूने रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येते. मर्जीतील विक्रेत्यांकडून साहित्य खरेदी होत असल्याचा आरोपही होतो. काही वेळा कमी दर्जााचे साहित्य जादा दराने घेतल्याचीही चर्चा रंगते. स्पर्धाच होत नसल्याने जादा किमतीतही दर्जेदार सािहत्य खरेदी होत नाही. त्यामुळे आता या प्रकारांना आळा बसणार आहे. २० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य खरेदी करायचे झाल्यास त्यासाठी ई-कोटेशन आॅनलाइन पद्धतीने मागवण्यात येणार आहे.अधिकाऱ्यांकडून होणार तपासणीखरेदी प्रक्रियेची वरिष्ठ अधिकारी तपासणी करण्याचा निर्णयही सीईओंनी घेतलेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. निविदेच्या अटी-शर्ती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याशिवाय अंतिम करू नये, तसेच जीएसटी क्रमांकही तपासून घ्यावा, असा आदेशही सीईओंनी दिला.१६ मेपर्यंत आॅनलाइन अहवाल सादर करा!खाते प्रमुखांच्या बैठकीत सीइओंनी अर्थ विभागासाठी महत्त्वाचे आदेश जारी केले. डिसेंबर २०१८ पर्यंतचा आॅनलाइन ताळमेळ झाला असून, उर्वरित ताळमेळ करून अहवाल १६ मेपर्यंत सादर करण्याचा आदेश सीईओंनी दिला. लेखा आक्षेप निकाली काढण्यासाठी प्रथम अनुपालन तयार करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्याची सूचना सीईओंनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद