शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉस मशीन बंद; जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:49 IST

रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिकधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात खोळंबा निर्माण होत आहे. गेल्या चार दिवसांपासून रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन बंद असल्याने जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिकधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दरमहा पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत करण््यात येते. रास्तभाव दुकानामार्फत वितरित करण्यात येत असलेल्या आॅनलाईन धान्य वितरण प्रक्रियेत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमध्ये ई-पॉस मशिन लावण्यात आल्या आहेत. यात मशिनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. परंतु रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामध्ये गत शनिवारपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद पडल्या असून, धान्य वितरण बंद पडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ई-पॉस मशिनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने सारे मुसळ केरात गेले आहे. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांच्या बोटाचे ठसे ई-पॉस मशिनवर उमटत नसल्यामुळे त्यांना धान्याच्या लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ई-पॉस मशिनवर ग्राहकांचे ठसे घेण्याकरिता दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.शासनाकडून आॅनलाईन धान्य वितरणाची राबविण्यात येत असलेली योजना शिधापत्रिकाधारकांच्या फायद्याची असली तरी ई-पॉस मशिनवर उमटत नसलेले बोटाचे ठसे आणि वारंवार ई-पॉस मशिन बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने उपाययोजना करुन जिल्ह्यात रास्तभाव दुकानांमधील वारंवार बंद पडणाऱ्या ई-पॉस मशिन तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने मशीन तातडीने दुरुस्त करण्यात याव्या, अन्यथा ई-पॉस मशिन जिल्हा पुरवठा विभागाकडे परत करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे यापूर्वीच देण्यात आला आहे.

गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन बंद आहेत त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण ठप्प आहे. त्यानुषंगाने ई-पॉस मशिन तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.- शत्रुघ्न मुंडेजिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार संघटना

टॅग्स :Akolaअकोला