शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-पीएफ’चे पोर्टल १५ तारखेनंतर होते ‘स्लो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:05 IST

१५ तारखेनंतर दस्तऐवज अपलोड होत नसल्याने कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काची रक्कम मिळण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ई-पीएफचे कार्यालयीन पोर्टल दर महिन्याच्या १५ तारखेनंतर ‘स्लो’ होत असल्याने अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पेन्शनधारक आणि कर्मचारी त्रासले आहेत. एकीकडे कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा आॅनलाइन होत असताना कार्यालयाची तांत्रिक यंत्रणाच लंगडी असल्याने कामाची गती मंदावली आहे. १५ तारखेनंतर दस्तऐवज अपलोड होत नसल्याने कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काची रक्कम मिळण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयामार्फत प्रत्येक कर्मचाºयाची महिन्यातून कपात होते. शासकीय कार्यालयापासून तर खासगी कंपनीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांची दरमहा कपात केली जाते. आजार, शिक्षण, घर बांधकाम तसेच लग्नासाठी ही रक्कम काढण्याची मुभा आहे. पूर्वी ही रक्कम काढण्यासाठी ई-पीएफ कार्यालयाचे उंबरठे झिजविले जायचे. कर्मचाºयांना होणारा त्रास आणि कर्मचाºयांवरील ताण दूर करण्यासाठी काही वर्षांपासून ई-पीएफ कार्यालयाचे कामकाज आॅनलाइन झाले. कर्मचाºयांची संपूर्ण माहिती आॅनलाइन अपलोड करण्याची सक्तीदेखील या कार्यालयाने केली आहे. त्यामुळे संगणक निरक्षर असलेल्यांची मोठी कोंडी होत आहे. या सेवेसाठी ई-पीएफ कार्यालयाने प्रत्येक ठिकाणीदेखील एक संगणक दालन उघडले आहे. अकोल्यातील सिव्हिल लाइन चौकातील कार्यालयात,अकोलासह वाशिम आणि बुलडाणा येथील निरक्षर वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचारी आणि कर्मचारी हक्काची रक्कम मिळण्यासाठी येतात; मात्र दर महिन्याच्या १५ तारखेनंतर पोर्टलवर लोड असल्याने कर्मचाºयांचे अर्ज आणि त्याचे दस्तऐवज अपलोड होत नाहीत.त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील गरजवंतांना रक्कम मिळण्यास विलंब होण्यासोबतच त्यांची फरपट होत आहे. ई-पीएफ पोर्टलची क्षमता वाढविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेनंतर साइट स्लो होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. १३ आणि १४ फेब्रुवारी २० रोजी सिस्टीम बंद पडली होती. तिन्ही जिल्ह्यांतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाºयांचे प्रकरण येथे असल्याने कामकाज काही प्रमाणात प्रभावित होते; मात्र ही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही.-सुशांत पाटील,सहायक आयुक्त, कर्म. भविष्य निधी कार्यालय अकोला.

टॅग्स :Akolaअकोला