शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात शहरात कचऱ्याचे ढीग; महापालिका झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:48 IST

अकोला: दिवाळीच्या दिवसांत शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे अकोलेकरांना नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे.

अकोला: दिवाळीच्या दिवसांत शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे अकोलेकरांना नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा पाहता अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाºया सत्ताधारी भाजपाला कर्तव्याचा विसर पडल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.दिवाळीच्या निमित्ताने शहरात विविध साहित्याची विक्री करण्यासाठी बाहेरगावचे व्यावसायिक, फूल विके्रता दाखल झाले होते. दीपावलीच्या रात्री ८ वाजेपर्यंत व्यावसायिकांनी गाशा गुंडाळला. साहजिकच रस्त्यांवर केळीची पाने, सडकी फुले, प्लास्टिक पिशव्यांसह विविध प्रकारचा कचरा साचला होता. मुख्य मार्गांवरील कचरा त्याच रात्री उचलणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना शक्य होते; परंतु सद्यस्थितीत महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसल्याचा गैरफायदा घेत गुरुवारी दुपारपर्यंतही मुख्य रस्त्यांलगत कचरा तसाच पडून असल्याचे चित्र समोर आले. हा प्रकार पाहता मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन तसेच आरोग्य निरीक्षक कोणते कर्तव्य निभावत होते, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.आरोग्य निरीक्षकांवर कारवाई नाहीच!महापालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचारी असो किंवा पडीत प्रभागातील खासगी कर्मचाºयांच्या दैनंदिन साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची आहे. शहरात कचºयाचे ढीग साचले असताना आरोग्य निरीक्षक झोपा काढतात की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा कामचुकार आरोग्य निरीक्षकांवर सत्ताधारी भाजपाने कधी कोणत्याही कारवाईची शिफारस केल्याचे ऐकिवात नाही.घंटा गाडी चालकांवरील नियंत्रण सुटले!शहरात दैनंदिन २४० टन कचरा तयार होतो. त्यामध्ये प्रत्येक घर, दुकाने, बाजारपेठ आदींचा समावेश आहे. हा कचरा जमा करण्यासाठी मनपाने घंटा गाडीची व्यवस्था केली असून, नायगावस्थित डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक क रणे अपेक्षित आहे. काही घंटा गाडी चालक तसे न करता स्वत:च्या सोयीनुसार त्या-त्या प्रभागातील खुल्या जागांवर कचºयाची साठवणूक करीत आहेत. मध्यंतरी सायंकाळी घराबाहेर फिरण्यासाठी निघालेल्या जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील एका नागरिकाला घंटागाडी चालकाने जोरदार धडक दिली. दुसºया घटनेत खदान परिसरात स्थानिक रहिवाशांनी घंटागाडीची तोडफोड केली. एकूण प्रकार पाहता मनपाच्या मोटार वाहन विभागाचे घंटा गाडी चालकांवर अजिबात नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका