शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

दिवसभरात कोरोनाचे ८९ रुग्ण वाढले; ६५ बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 19:00 IST

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६८, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २१ असे एकूण ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३१८ झाली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची गती किंचितसी कमी झाली असून, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६८, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २१ असे एकूण ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३१८ झाली आहे. दरम्यान, रविवारी कोरोनामुळे निधन झालेल्या एक रुग्णाची सोमवारी नोंद घेण्यात आल्यामुळे मृतकांचा आकडा वाढून २२६ वर पोहचला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १० जणांसह सिंधखेड, गौरक्षण रोड, विठ्ठल नगर व जीएमसी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, सिव्हील लाईन, वडाळी देशमुख, अकोट, तेल्हारा, शास्त्री नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, टी फॅक्टरी, पोळा चौक, बोरगाव मंजू, बाळापूर, लहान उमरी, अकोली जहागीर, गोडबोले प्लॉट, गोकूल कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, जोगळेकर प्लॉट, मलकापूर, डाबकी रोड, जठारपेठ, शिवाजी नगर, कपिला नगर, व्यकेटेश नगर, शास्त्री नगर, पिंपरी, धामोरी, भगोरा, सिरसो, निर्सग अर्पाटमेन्ट व गुडधी येथील प्रत्येकी एक अशा ५९ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी कौलखेड येथील तीन जणांसह बस स्टँड मागे, महसूल कॉलनी, दुर्गा चौक, शिवाजी नगर, गोरेगाव, कोठारी वाटीका येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.रविवारच्या मृतकाची सोमवारी नोंदसोमवारी कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. जीएमसीच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या पतीचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची नोंद सोमवारच्या अहवालात घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या २२६ झाली आहे.६५ कोरोनामुक्तउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २९, कोविड केअर सेंटर अकोला येथून २१, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, युनिक हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून १० अशा एकूण ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,५९५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,३१८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५४९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५९५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या