शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराच्या ओझ्यामुळे ६४ टक्के चिमुकले त्रस्त!

By admin | Updated: March 26, 2016 02:15 IST

उपाययोजना करण्याची गरज; बुलडाणा ‘आयएमए’च्या पदाधिका-यांचा पुढाकार.

हर्षनंदन वाघ / बुलडाणातुमचे पाल्य शाळेत नेत असलेल्या दप्तराच्या ओझ्याकडे डोळसपणे पाहण्याची व त्यावर उपाय काढण्याची वेळ आली आहे. दप्तराच्या ओझ्यामुळे पाल्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, ६४ टक्के चिमुकले त्रस्त झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. प्रमाणाबाहेर वजनदार दप्तरांमुळे मुलांना मानेच्या व पाठीच्या स्नायूचे विकार, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण येणे यासारखे विकार होऊ शकतात. शासनाने या विषयावर चर्चा करण्यासाठी समिती नेमून काही उपाययोजना सुचविल्या होत्या. परंतु त्यावर पालक व शाळा दोघांकडूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. बुलडाणा येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. अविनाश सोळंकी यांनी या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन 'लिटिल एंजल्स' हा उपक्रम सुरू केला. त्या अन्वये त्यांनी आयएमएचे सदस्य डॉ. गजानन व्यवहारे, डॉ. बिपीन शेंडे, डॉ. अशोक भवटे, डॉ. संदीप साबळे, डॉ. मारूती चाटे, डॉ. प्रतिमा व्यवहारे, डॉ. प्रमिला सोळंकी, डॉ. रवींद्र सोळंकी, डॉ. अनिल साळोक, डॉ. पंकज हरकुट, डॉ. विनोद जाधव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांचेबरोबर पालकांशी देखील संवाद साधला. निदर्शनाअंती त्यांना असे दिसून आले, की दप्तराचे ओझे व दुष्परिणाम कमी करण्यासाठी शाळा व पालक दोघांचाही बरोबरीचा सहभाग असणे आवश्यक आहे. याबाबत पर्यवेक्षीय अधिकार्‍यांनी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन दप्तराचे वजन करून ते कमी असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. आजची मुले ही उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे या भविष्याचा पाया आतापासूनच मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाच्या प्रत्येक सदस्याकडून सहयोग हा असायलाच हवा. केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा चालढकल केल्यास भविष्यात मुलांना गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन आयएमएचे पदाधिकार्‍यांनी केले आहे. 'आयएमए'चा 'लिटिल एंजल्स' उपक्रमबुलडाण्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ह्यलिटिल एंजल्सह्ण उपक्रम सुरू केला असून, एका सर्व्हेनुसार दप्तराच्या ओझ्यामुळे ६४ टक्के चिमुकले त्रस्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे असोसिएशनने डॉ.अविनाथ सोळंकी यांच्या नेतृत्वात प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षक तसेच पाल्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय ह्यलिटिल एंजल्सह्ण या उपक्रमांतर्गत लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.