शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशपत्र डाउनलोड न झाल्यामुळे पाचशेच्यावर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 13:01 IST

अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या २0१९-२0 च्या इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी जिल्ह्यातून ५ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज डाउनलोड न झाल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. प्रवेशपत्र मिळत नसल्याने पालकांनी स्थानिक स्तरावर तक्रारसुद्धा केली; परंतु ही प्रक्रिया केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळाकडून होत असल्याने, स्थानिक स्तरावर जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाला कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यामुळे ५ हजार ५३३ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ९९१ विद्यार्थ्यांनाच परीक्षा देता आली. इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रांवर शनिवारी नवोदयची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लागणार असून, यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बाभूळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या ८0 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)यंदा प्रथमच विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज मागविले होते. पहिल्या टप्प्यात नोंदणी आणि दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड न झाल्यामुळे त्यांना प्रवेशपत्रापासून वंचित राहावे लागले.-मिलिंद बनसोडे,परीक्षा प्रमुख, जवाहर नवोदय विद्यालय.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा