शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

लोकप्रतिनिधी-अधिका-यांच्या समन्वयाअभावी रखडल्या योजना!

By admin | Updated: August 27, 2015 01:11 IST

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे जिल्हा परिषदेवर ताशेरे; योजना मार्गी लावण्याचे निर्देश.

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना लोकप्रतिनिधी (पदाधिकारी) आणि अधिकार्‍यांच्या समन्वयाअभावी अडकल्या असल्याच्या मुद्यावर बोट ठेवत राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने बुधवारी जिल्हा परिषदेच्या कारभारावर ताशेरे ओढले. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत प्रलंबित योजना आणि प्रशासकीय कामे मार्गी लावण्याचे निर्देशही आयोगाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष सी.एल. थूल, सदस्य आर.डी. शिंदे यांच्यासह सदस्य सचिव आर.एच.मेंढे यांनी बुधवार, २६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदमार्फत अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना, भरती प्रक्रिया, पदोन्नती आणि सोयी-सुविधांसह प्रकरणांचा निपटारा व तक्रारींचे निवारण यासंदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण व पाणीपुरवठा या विभागामार्फत अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविण्यात येणार्‍या योजना, त्याअंतर्गत उपलब्ध निधी याबाबत आयोगाकडून माहिती घेण्यात आली. योजनांसाठी उपलब्ध निधी खर्च का होत नाही, यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना विचारणा केली. शेळ्या-मेंढय़ा वाटप योजनेसह विभागनिहाय विविध योजनांसाठी उपलब्ध निधी खर्च करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांमधील समन्वयाच्या अभावामुळे योजना रखडल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने, या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या कारभारावर आयोगाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या रखडलेल्या योजना येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मार्गी लावण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थूल यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्‍यांबाबत भरती, पदोन्नतीची प्रलंबित प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.