शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्त्या न झाल्याने अकोला जिल्ह्यातील विषय शिक्षक अतिरिक्त ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 14:03 IST

अकोला : जिल्ह्यातील इयत्ता ६ ते ८ साठी विषय शिक्षक पदावर नियुक्त्या न झाल्यामुळे येत्या बदली प्रक्रियेत शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत.

ठळक मुद्दे वर्ग ६ ते ८ या संवर्गात पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या अद्यापही न झाल्याने त्या जागेवर वर्ग १ ते ५ मधील उपशिक्षक सध्या कार्यरत आहेत.ते शिक्षक बदली प्रक्रियेत अंडर ग्रॅज्युएट टीचर १ ते ५ या संवर्गात अर्ज करीत आहेत. आता इयत्ता १ ते ५ च्या शिक्षकांचा काहीही दोष नसताना त्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत.

अकोला : जिल्ह्यातील इयत्ता ६ ते ८ साठी विषय शिक्षक पदावर नियुक्त्या न झाल्यामुळे येत्या बदली प्रक्रियेत शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तातडीने निकाली काढाव्या, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्याध्यक्ष श्याम कुलट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.परिषदेने दिलेल्या निवेदनात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील वर्ग ६ ते ८ या संवर्गात पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या अद्यापही न झाल्याने त्या जागेवर वर्ग १ ते ५ मधील उपशिक्षक सध्या कार्यरत आहेत. ते शिक्षक बदली प्रक्रियेत अंडर ग्रॅज्युएट टीचर १ ते ५ या संवर्गात अर्ज करीत आहेत. त्यांचे मूळ पद याच वर्गासाठी असल्याने त्यांचे मॅपिंगही त्याच संवर्गात झाले आहे. या कारणास्तव या संवर्गात शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात इयत्ता ६ ते ८ साठी पदवीधर शिक्षकांच्या विषयनिहाय नियुक्त्या केल्यास ती पदे रिक्त राहणार नाहीत. तसे न झाल्यास शिक्षकांवर अन्याय होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांच्या नियुक्त्या दोन ते तीन वर्षांपूर्वीच झाल्या आहेत; मात्र अकोला जिल्ह्यात तसे झाले नाही. आता इयत्ता १ ते ५ च्या शिक्षकांचा काहीही दोष नसताना त्यांना परिणाम भोगावे लागणार आहेत. इयत्ता ६ ते ८ या पदावर तातडीने नियुक्त्या करून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी परिषदेच्यावतीने निवेदनात करण्यात आली. यावेळी सचिन काठोळे, नितीन बंडावार, मुरलीधर कुलट, अरुण वाघमारे, सुनील माणिकराव, विजय वाकोडे, गजानन लोणकर, मो. वसिमोद्दीन, चंद्रशेखर पेठे, देवेंद्र वाकचवरे, संतोष वाघमारे, अंजली मानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद