शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बहावा बहरल्याने यंदा वेळेवर, चांगला पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:31 IST

यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. अशी माहिती वनस्पती शास्त्रज्ञ  डॉ. सहदेव रोठे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

ठळक मुद्देवनस्पती शास्त्रज्ञांचा दावाविविध वनस्पतींच्या फुलण्यावरून मिळतात पावसाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने, यंत्रसामग्री नव्हती; परंतु निसर्गच पावसाच्या आगमनाचा संकेत द्यायचा आणि आताही निसर्ग तेच काम करतो. त्यामुळे शेतकर्‍याला  पावसाचा अंदाज घेता येत असे. निसर्गातील प्रत्येक झाडाचा फुले, फळे येण्याचा एक विशिष्ट काळ आहे. काही झाडे, वनस्पतींचे काही गुण आहेत. यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. अशी माहिती वनस्पती शास्त्रज्ञ  डॉ. सहदेव रोठे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सध्या वैज्ञानिक युगामध्ये पाऊस कधी येणार, हे सांगणारी यंत्रणा, हवामानशास्त्र प्रगत असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासी बांधव हे अनेक गोष्टींवरून पाऊस लवकर येणार की उशिरा येणार, याचा अंदाज घेतात. निसर्गच पावसाच्या आगमनाची चाहूल देतो. अनेक वनस्पती या नैसर्गिक बदलाचे संकेत, संदेश देतात. बहावा ही आकर्षक पिवळय़ा रंगाची फुले येणारी वनस्पती आहे. बहावा फुलण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. एप्रिल महिन्यात बहावा ही वनस्पती पूर्णत: फुलून येते; परंतु यंदा बहावा ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात बहरली आहे. यावरून पावसाचा अंदाज काढता येतो. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होण्याचे संकेत बहावा वनस्पतीने दिले आहेत. निसर्गामध्ये अनेक वनस्पती, झाडे आहेत. त्यांच्या बहरण्यावरून पावसाचा अंदाज काढता येतो. मोह फुले बहरण्यावरून आदिवासी बांधव पावसाचा अंदाज काढतात. त्याचप्रमाणे बहावा या झाडाला किती फुले, यावरून यावर्षी किती प्रमाणात पाऊस पडणार किंवा पावसाळा कसा राहील, याचा अंदाज काढल्या जातो. 

यावरूनही मिळतात पावसाचे संकेतअनेक पक्षी पावसाचे संकेत देतात. काही पक्षी त्यांची घरटी झाडाच्या वरच्या टोकाला साकारत असतील, तर यावरून निश्‍चितपणे पाऊस भरपूर येण्याचा अंदाज काढल्या जातो. मोहा बहरल्यावर आदिवासी बांधव ही फुले एक पानांची परडी तयार करून ते नदी, तलावामध्ये सोडतात. परडी किती दूर गेली, यावरूनही पावसाचा अंदाज ठरवितात. 

या वनस्पती देतात संकेत- दैनंदिन पाहणी व अभ्यासातून झाडांचे वैशिष्ट्य, गुण आपल्याला दिसून येतात.   सोनमोहोर या झाडाला दसर्‍याच्या वेळेस फुले येतात. त्यामुळे सोनमोहोर फुलून दसर्‍याचे स्वागत करतो, असा समज लोकांमध्ये आहे. - त्याचप्रमाणे काशीद या झाडाला फुलांचा बहर हा रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये येत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी काशीद झाडाला बहर येतो, असा समज असल्याचे मानले जाते. -होळी उत्सवादरम्यान पळसाला बहर येतो. मार्च, एप्रिल महिन्यात जंगलातील अनेक झाडांना फुले, मोहर येतो. त्यामुळे आदिवासी, गावकरी या फुलांच्या मोहरावरून पर्जन्यमानाचा अंदाज घेतात. 

प्रत्येक झाडाचा फुले, फळे येण्याचा एक विशिष्ट काळ आहे. अनेक झाडे, वनस्पती निसर्गाशी संबंधित संदेश देतात; परंतु त्याला वैज्ञानिक आधार नसला, तरी एक प्रचलित मान्यता आहे. यंदा बहावा ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात बहरली आहे. त्यांच्या फुलांच्या बहरावरून यंदा पाऊस वेळेवर व चांगला होण्याचे संदेश मिळतात. - डॉ. सहदेव रोठे, वनस्पती शास्त्रज्ञप्राचार्य, मेहरबानो महाविद्यालय.

टॅग्स :Akolaअकोला