शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांच्या उदासीनतेमुळे प्रोत्साहन भत्त्यापासून विद्यार्थिनी वंचित!

By admin | Updated: April 19, 2017 00:44 IST

अकोला- मुख्याध्यापकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ६५० विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहेत.

एससी, एसटी विद्यार्थिनींसाठी योजनानितीन गव्हाळे - अकोलाअनुसूचित जाती, जमातीमधील एकही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून वार्षिक तीन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली; परंतु शासनाच्या योजनेला मुख्याध्यापकांकडूनच सुरुंग लावल्या जात आहे. मुख्याध्यापकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ६५० विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहेत. अनुसूचित जाती, जमातीमधील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभागाने २०१४ व १५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मिळावा, यासाठी जिल्ह्यातील शाळांकडून आॅनलाइन प्रस्ताव मागविले होते. यात विद्यार्थिनींची संख्या, त्यांचे खातेक्रमांक आणि शाळेचे नाव आदी माहिती आॅनलाइन प्रस्तावामध्ये भरण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील काही शाळांनी ही माहिती आॅनलाइन भरली. शासनाकडून ५७ शाळांमधील ६५० विद्यार्थिनींना प्रत्येकी तीन हजार रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्त्याचे अनुदान शिक्षण विभागाला प्राप्त झाले; परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांनी अद्यापपर्यंत दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींची माहितीसह बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड, विद्यार्थिनीचे आसन क्रमांक आणि दहावीत मिळालेल्या टक्केवारीची माहितीच शिक्षण विभागाला दिली नाही. विद्यार्थिनींची माहिती देण्यास मुख्याध्यापक उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून वारंवार मुख्याध्यापकांकडे माहिती पाठविण्याचा आग्रह धरल्यानंतरही मुख्याध्यापकांकडून माहिती पाठविण्यात येत नसल्याने विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. १.९५ कोटी परत जाण्याची भीतीशासनाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमातीमधील विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता म्हणून १ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान शिक्षण विभागाकडे जमा केले; परंतु मुख्याध्यापक विद्यार्थिनींची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने विद्यार्थिनींना विनाकारण तीन हजार रुपयांच्या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. यावर्षी १४२ शाळांचे प्रोत्साहन भत्त्यासाठी प्रस्तावयेत्या २०१७ व १८ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मिळावा, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांकडून आॅनलाइन प्रस्ताव मागविले होते. यात विद्यार्थिनींची संख्या, त्यांचे खातेक्रमांक आणि शाळेचे नाव आदी माहिती आॅनलाइन प्रस्तावामध्ये भरण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १४२ शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रोत्साहन भत्त्यासाठी आॅनलाइन माहिती भरली. यापैकी ३३ शाळांमध्ये प्रस्ताव तांत्रिक अडचणींमुळे अपलोड होऊ शकले नाहीत.एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी १ कोटी ९५ लाख रुपये प्रोत्साहन भत्त्यासाठी मिळाले आहेत; परंतु मुख्याध्यापकांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थिनींना रकमेपासून वंचित राहावे लागत आहे. -आत्माराम राठोड, सहायक शिक्षण उपनिरीक्षक