शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

तीन लाखांच्या अटीमुळे महिला बचत गटांची संधी हिरावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:56 IST

सदानंद सिरसाट अकोला : बालकांना पोषण आहार पुरवठा करण्याच्या कामासाठी बचत गटांची निवड करताना गटाची वार्षिक उलाढाल तीन लाख ...

सदानंद सिरसाटअकोला : बालकांना पोषण आहार पुरवठा करण्याच्या कामासाठी बचत गटांची निवड करताना गटाची वार्षिक उलाढाल तीन लाख रुपये असण्याच्या अटीमुळे राज्यातील अनेक तालुक्यात बचत गटांना निविदा प्रक्रियेत सहभागीच होता आले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात निविदा प्राप्तीची संख्या निरंक असल्याने महिला व बालकल्याण विभागाला दुसऱ्यांदा ही प्रक्रिया राबवण्यासाठी अटी शिथिल करण्याची वेळ आली आहे.अंगणवाड्यांमध्ये गरम, ताजा आहार व ‘टीएचआर’ पुरवठा करण्यासाठी महिला बचत गटांची निवड करणारी निविदा प्रक्रिया सर्वच जिल्हा स्तरावर आॅगस्ट २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. जिल्हास्तरीय आहार समितीमार्फत निविदा प्रक्रिया राबवून राज्यातील ५५३ प्रकल्पांत स्थानिक बचत गट, महिला मंडळाची निवड केली जाणार आहे. ती निविदा प्रक्रिया राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात अद्यापही पूर्ण झालेली नाही. जाचक अटींमुळे महिला सबलीकरणाला हातभार लावणाºया या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या हाताला काम मिळण्याची शक्यताच धुसर असल्याचे लोकमतने २४ आॅगस्ट २०१९ रोजीच्या अंकात मांडले होते, हे विशेष. ही बाब अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा या तीन तालुक्यातून एकाही बचत गटाची निविदा प्राप्त न झाल्याने स्पष्ट झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून अटींमध्ये शिथिलता आणण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आता दरमहा किमान दहा हजार रुपये उलाढाल असलेल्या बचत गटांना संधी मिळण्याची शक्यता आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र शासनाने २००९ मध्ये सुधारित पोषण आहार पद्धती लागू करण्याचे म्हटले. त्यानुसार लाभार्थींना सूक्ष्म पोषक तत्त्वाद्वारे समृद्ध, स्वच्छतापूर्ण वातावरणात तयार केलेला (टीएचआर) आहार देण्याचे बंधन घालण्यात आले. त्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने निविदा प्रक्रियेत बचत गटांसाठी अशक्य असलेल्या अटींचा भडीमार केला आहे. त्यामध्ये तीन लाख रुपये वार्षिक उलाढाल असणे आवश्यक आहे. ही रक्कम पाहता ग्रामीण भागातील बचत गटांना निविदेत सहभाग घेणे अशक्य झाले. तर जिल्ह्यातील कोणत्याही गटाला स्थानिक पातळीवरच संधी आहे. या अटींमुळे निविदा प्रक्रिया रखडली आहे, तर महिला व बालकल्याण विभागाने कोणतीही निविदा न राबवता महाराष्ट्र स्टेट को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनला दिलेले काम बिनबोभाटपणे सुरू राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला