शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेतही दुष्काळी मदत वाटप करता येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:44 IST

अकोला: आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदतीचे वाटप शासकीय नियमानुसार करण्यास हरकत नसल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत १४ फेबु्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना निर्गमित करण्यात आले आहे.

- संतोष येलकरअकोला: आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदतीचे वाटप शासकीय नियमानुसार करण्यास हरकत नसल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत १४ फेबु्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेतही दुष्काळी मदतीचे वाटप करता येणार आहे.राज्यातील २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या गत १४ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या आचारसंहिता संदर्भात एकत्रित आदेशातील भाग क्र . ४ अनुक्रमांक -४ मध्ये ‘दुष्काळ, पाणीटंचाई, इतर नैसर्गिक आपत्ती व गंभीररीत्या आजारी असलेल्यांना मदत करणे व सुरू असलेल्या योजना पुढे सुरू ठेवता येतील. आचारसंहिता असल्याने दुष्काळ अथवा पाणीटंचाई दूर करण्याबाबत कार्यवाही करू नये, असा आचारसंहितेचा अर्थ होत नाही. त्यामुळे दुष्काळ, पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्ती निवारण करण्यासाठी बंदी असणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुषंगाने आचारसंहिता असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदतीचे वाटप शासकीय नियमानुसार करण्यास हरकत नाही. असे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी १४ फेबु्रवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना निर्गमित केले. त्यामुळे आचारसंहितेतही दुष्काळी मदतीचे वाटप करता येणार आहे.मदतीचे वाटप करताना मंत्री-लोकप्रतिनिधी नको!आचारसंहिता असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदत वाटप करण्यास हरकत नाही. तथापि, मदतीचे वाटप करताना मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सदस्य उपस्थित नसावे तसेच आचारसंहितेचा भंग होईल, अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करण्यात येऊ नये, अशा सूचनाही राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रात देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी