शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यात दमदार पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:24 IST

अकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यात नदी, नाल्यांना पूर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. पोहरा नाला दुथळी भरून वाहत होता, तर मोहाळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. सातपुड्यातसुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पोपटखेड धरणाच्या जलपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद असून, आतापर्यंत ५0२ मी.मी. पाऊस झाला आहे. शहरातील अकबरी व इफ्तेखार प्लॉटमध्ये नाल्यातील पाणी घरात घुसले. या ठिकाणी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, तलाठी दिनेश मोहोकार, नरेश रतन व नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार यांनी पाहणी केली. शहरातील जिनगरवाडी, शनवारा, खानापूर वेस आदी भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. 

शिर्ला येथे जोरदार पाऊसशिला : परिसरात ९ ऑक्टोबर रोजी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे गावात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परतीच्या पावसाने सोयाबीन सोंगणीची दाणादाण उडवून दिली. त्यामुळे घराच्या उंबरठय़ावर असलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले; मात्र तूर पिकाला पाऊस लाभदायक ठरला आहे. पावसाचा आवेग खूप जास्त असल्याने श्रीकांत पर्वतावरून धबधब्याप्रमाणे  पावसाचा शुभ्रधवल धारा कोसळत होत्या.

बोरगाव परिसरात पावसाची हजेरीबोरगाव मंजू : परिसरात गत दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कापूस व तूर पिकांना संजीवनी मिळाली आहे. सोयाबीन पीक सोंगणीला असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली, तर शेतकर्‍यांची धांदल उडाली असल्याचे चित्र आहे. 

घरात पाणी शिरल्यामुळे रात्रभर जागरणखेट्री : येथे सोमवार रोजी दुपारी मुसळधार पाऊस पडला. पावसाचे पाणी येथील रामदास मालोकार यांच्या घरात शिरल्यामुळे घरातील दोन क्विंटल गहू व २0 किलो उडीद व इतर घरगुती साहित्य असे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरात पाणीच पाणीच साचले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रात्रभर जागरण करून रात्र काढावी लागली. अन्न व धान्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई करून देण्याची मागणी रामदास मालोकार यांनी केली आहे.