शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सात जिल्ह्यांवर मदतीचा दुष्काळ!

By admin | Updated: March 12, 2016 02:29 IST

विदर्भावर अन्याय; विदर्भातील केवळ ५३५ गावांचाच समावेश.

ब्रम्हानंद जाधव/मेहकरविदर्भात दुष्काळाच्या झळा अधिक असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीत विदर्भावर अन्याय दिसून येत आहे. राज्यात सन २0१५-१६ मध्ये एकूण १४ हजार ७0८ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली असून, राज्याच्या तुलनेत विदर्भातील केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेशच नसल्याचे या जिल्ह्यांवर शासनाच्या मदतीचाही दुष्काळ आहे. दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. खरीप व रब्बी हंगामातील नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये शासनाकडून विविध योजना राबवून शेतकर्‍यांना आधार दिला जात आहे. गतवर्षी राज्यभर अत्यल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली, तर विदर्भातील शेतकर्‍यांना शेतीसाठी लागलेला खर्चही भरून निघाला नाही. सन २0१५-१६ मधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी काढून ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांकरिता शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात; मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ असतानाही पैसेवारी जास्त दाखविण्यात आलेली आहे. राज्यातील ४0 हजार ५३ गावांमध्ये पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये १४ हजार ७0८ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी व २५ हजार ३४५ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त दाखविण्यात आलेली आहे. तथापि, राज्याच्या तुलनेत विदर्भातून सर्वांत कमी गावांचा समावेश ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीत करण्यात आला आहे. विदर्भातील १५ हजार २६४ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विदर्भातून केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली आहे, तर १४ हजार ७२९ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त दाखविण्यात आलेली आहे. दुष्काळ अधिक असूनही पैसेवारीमध्ये राज्याच्या इतर विभागांच्या तुलनेत विदर्भावर अन्याय झाला असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेशच नाही. त्यामुळे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना मिळणार्‍या शासानाच्या विविध योजनांच्या लाभापासून विदर्भातील सात जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना वंचित राहावे लागणार आहे.विदर्भ दुष्काळात समोर; पैसेवारीत माघारसन २0१५-१६ खरीप हंगामातील हंगामी पैसेवारीमध्ये विदर्भातील अनेक गावांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. विदर्भातील अमरावती विभागामध्ये तर केवळ ५७ गावांचाच ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ५५ व यवतमाळ जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश आहे. नागपूर विभागातून ४७८ गावांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १११ व गडचिरोली जिल्ह्यातील ३६७ गावांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या तुलनेत विदर्भातील केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आल्याने विदर्भाबाबत ह्यदुष्काळात समोर, तर पैसेवारीत माघारह्ण अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.