शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा हैद्राबाद येथील उद्योगासोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 15:22 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हैद्राबाद येथील एका उद्योगासोबत सामंजस्य करार केला.

अकोला: कृषी प्रक्रिया यंत्राचा विस्तार करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हैद्राबाद येथील एका उद्योगासोबत सामंजस्य करार केला. ही प्रक्रिया केंद्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोेचण्यासाठी कृषी विद्यापीठाने या अगोदरही अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने अनेक शेतीपयोगी तसेच प्रक्रिया यंत्र विकसित केली आहेत. या यंत्राचा विस्तार होऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग उभारावेत, शेतकरी गटांना मदत व्हावी, या उद्देशाने कृषी विद्यापीठाचे काम सुरू आहे. ११ सप्टेंबर रोजी कृषी विद्यापीठातील सभागृहात कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एम.बी. नागदेवे, डॉ. प्रदीप ए. बोरकर व उद्योगाकडून कृष्णकुमार एम. हेमसुंदर डी यांनी करारावर स्वाक्षरी करू न यंत्राच्या विस्तारासाठीचे कृषी विद्यापीठाने आणखी एक पाऊल टाकले. याप्रसंगी डॉ. बोरकर यांनी हैद्राबाद येथील उद्योग राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. नागदेवे यांनी कृषी प्रक्रिया उद्योगास चालना देण्याकरिता कृषी विद्यापीठ कटिबद्ध असल्यानेच शेतकºयांना व त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी व्ह्यल्यूअ‍ॅग्रो सारख्या समूहासोबत करार केला असल्याचे सांगितले. कृष्णकुमार यांनी व्ह्यल्यूअ‍ॅग्रो हा एक नवीन कृषी व्यवसाय असून, शेतकरी, ग्रामीण जनतेला अन्नप्रक्रिया उत्पादन करण्यास प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. कृषी प्रक्रिया केंद्र तयार करण्यासाठी आम्ही तत्पर असून, शेतकरी गटांसोबत कराम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात प्रक्रिया उद्योग यंत्राच्या खरेदीसाठी आर्थिक सहायदेखील करण्यात येते.यावेळी सुशील सक्कलवार, मोहिनी डांगे, व्ही.डी. मोहड,आर.डी. बिसेन, डी.आर. धुमाले,जी.जे. घावट, संकेत खंदारे, डी.बी. घावघावे, पी.एच. सोळंके, नीलेश राठोड, संतोष मानकर, जनार्दन निंबाळकर, अविनाश देशमुख इत्यादींची उपस्थिती होती.फोटो-

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ