शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा माती परीक्षणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 13:59 IST

माती परीक्षण करणे गरजेचे असल्याने यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने माती परीक्षणावर भर दिला आहे.

अकोला: भरघोस उत्पादनासाठी मातीचा सामू बघून पिकांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असल्याने यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने माती परीक्षणावर भर दिला आहे. कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात कृषी विद्यापीठ विदर्भातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती विकासासाठीचे प्रोत्साहन देणार आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वत:च शेतात जाऊन मातीचे नमुने घ्यायचे आणि या नमुन्याचे परीक्षण झाल्यानंतर ते थेट शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा अभिनव निर्णय राबविला आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात यावर पुन्हा भर देण्यात आला आहे. माती हा शेतकºयांचा जिव्हाळ््याचा प्रश्न आहे. या मातीत सोळा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत; पण शेतीचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याचे प्रत्येक पावसाळ््यात शेतातील माती आणि त्यासोबतच १६ सूक्ष्म अन्न द्रव्य वाहून जात असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याने कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने शेताची बांधबधिस्ती करण्याचे काही नवे तंत्रज्ञान शेतकºयांना सांगितले आहेत. उताराला आडवी पेरणी, कंटुर, गादी वाफा पद्धतीने शेती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संकल्पनेतील अनुुभवातून शिक्षण उपक्रमांतर्गत या कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी थेट बांधावर जाऊन माती व पाणी परीक्षण मागील दोन तीन वर्षात करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी ‘समृद्धी रथ’ तयार केला होता. विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन माती परीक्षणाचे नमुने घेतले होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वत: मातीचे प्रयोग शाळेत पृथक्करण करू न परीक्षणाचे अहवाल शेतकºयांच्या घरी पोहचून दिले. यावर्षी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी, शास्त्रज्ञ घरोघरी जाऊन शेतकºयांना शाश्वत शेतीसाठीची माहिती देत आहेत. कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान, संशोधन शेतकºयांना समजावून सांगण्यात येत आहे. कृषी विद्यापीठाच्यावतीने येत्या महिन्यात खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा घेण्यात येणार असून, शेतकºयांना विविध पिकांचे नियोजन व त्यांच्या शंकाचे निरसण केले जाणार आहे.

माती परीक्षणावर आमचा भर असून, शेतकºयांना माहिती दिली जात आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात विद्यार्थी, शास्त्रज्ञ विदर्भातील गावागावा जाऊन शेतकºयांना मार्गदर्शत करीत आहे.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ