शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंदेकृविचा शेतीपूरक उद्योग उभारण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:55 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर मिळाले आहे. येथे तरुणांना प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी व शेतकरी केंद्र सरकारच्या कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नासोबतच शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येईल.या केंद्रांतर्गत नवउद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामधे नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री-सीड स्टेज फंडिंग प्रोग्राम व असलेल्या उत्पादन, सेवा या उद्योगात रूपांतरित करण्यासाठी सीड स्टेज फंडिंग प्रोग्रामचे आयोजन केले असून, या कार्यक्रमांतर्गत नवउद्योजक व युवकांना मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन ५ लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य पुरविणे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या उत्पादनांसाठी २५ लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य पुरविणे असे आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या नवउद्योजकांना अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण, विशेष तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन, इनक्युबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरविण्यात येतील.ही योजना मुख्य अन्वेषकचे डॉ. एस.जे. गहूकर हे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. पी. जी. इंगोले अधिष्ठाता (कृषी) डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित सह-अन्वेषक ए. एन. पासलावार, सह-अन्वेषक गुप्ता यासाठी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र