शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉ. बाबासाहेब’ ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही - प्रा. ऋषिकेश कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:10 IST

डॉ. बाबासाहेब हे काही दलितांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाबासाहेब आणि त्यांचे विचार ही प्रत्येक उपेक्षित माणसांची प्रॉपर्टी आहे, असे विधान वक्ता प्रा. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) यांनी केले.

अकोला: शालेय अभ्यासक्रमात ‘थोरांची ओळख’ या पुस्तकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक प्रकरण शिकविल्या जायचे. या प्रकरणामध्ये पहिलेच वाक्य ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी होते’, असे होते. आजही हेच बालमनावर बिंबविल्या जाते; परंतु डॉ. बाबासाहेब हे काही दलितांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाबासाहेब आणि त्यांचे विचार ही प्रत्येक उपेक्षित माणसांची प्रॉपर्टी आहे, असे विधान वक्ता प्रा. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) यांनी केले.दीनबंधू सृजनशील मंडळाच्यावतीने आयोजित आचार्य दीनबंधू व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना शनिवारी प्रा. कांबळे ‘लोकशाहीला धर्मांधांचे आव्हान व आजचे राजकारण’ या विषयावर बोलत होते. प्रा. कांबळे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचताना, त्यांचे विचार आत्मसात करताना ते पहिले समजून घेतले पाहिजे. ओबीसी, सोशल जस्टिस हे शब्द प्रयोगदेखील पहिल्यांदा बाबासाहेबांनीच दिलेले आहेत. सोशल इंजिनिअरिंगची गोष्ट आज आपण करतो; मात्र ही चळवळदेखील त्या काळी बाबासाहेबांनीच सुरू केली. बाबासाहेबांनी युगानुयुगाचे मनुष्यत्व आपणास बहाल केले आहे. त्यामुळे स्वाभिमानाचा दिवा आपल्या हातून कधीच विझू नये, याची काळजी घेतली पाहिजे, असेदेखील कांबळे यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद मानवतावादावर आधारलेला आहे. भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिबिंब त्यांनीच तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेत उमटले आहे. त्यांचा राष्ट्रवाद धर्मातीत आहे. धर्मनिष्ठ राष्ट्रवाद हा मुलत: लोकशाहीविरोधी असतो. अशा राष्ट्रवादामध्ये भिन्नधर्मीय अल्पसंख्याक वर्गाला दुय्यम नागरिकत्व प्राप्त होते. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही ही सामाजिक लोकशाही आहे. संसदीय लोकशाहीला ते सामाजिक लोकशाही म्हणतात. कारण जन्म सिद्धतेवर अवलंबून असलेली प्रतिष्ठा आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे इथला दलित, बहुजन समाज सवर्णांच्या मानसिक व आर्थिक गुलामगिरीतून स्वतंत्र व समर्थ होऊ शकला नाही. कनिष्ठ वर्ग, शुद्रातिशुद्रांना सत्ता व हक्क, प्रतिष्ठा यापासून वंचित ठेवण्यात आले. अशा सर्वांसाठी सामाजिक समता प्रस्थापित करणे आवश्यक होते. आज देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. धर्मांधता वाढली आहे. भारत जसा मनोरुग्णांचा देश आहे, तसाच दलदलींचा प्रदेश आहे. जो आंबेडकरवादी असतो, तो जात मानत नाही आणि जो जात मानतो, तो आंबेडकरवादी असू शकत नाही, असेही कांबळे यांनी सांगितले. व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. बी. शेगावकर होते. प्रास्ताविक शेगावकर यांनी केले. वक्त्यांचा परिचय डॉ. प्रा. एम. आर. इंगळे यांनी करू न दिला. 

 

टॅग्स :Akolaअकोला