शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या जागा, व्यावसायिक संकुलांसह दुकानांचा ‘डीपीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:02 IST

अकोला: शहरात विविध भागातील महापालिकेच्या मालकीच्या जागा, उद्याने यांच्यासह व्यावसायिक संकुल तसेच वार्षिक भाडेपट्ट्यावर दिलेल्या दुकानांची इत्थंभूत माहिती जमा करून नगररचना विभाग, बाजार विभागाचा डाटा अपडेट केला जाणार आहे.

ठळक मुद्देशहरात महापालिकेच्या मालकीच्या विविध ठिकाणी जागा आहेत. बोटावर मोजता येणारे उद्यान वगळता इतर जागा अतिक्रमकांच्या ताब्यात आहेत.मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी या दोन्ही विभागाचा डाटा अपडेट क रण्यासाठी निविदा प्रकाशित केली आहे.

-  आशिष गावंडे

अकोला: शहरात विविध भागातील महापालिकेच्या मालकीच्या जागा, उद्याने यांच्यासह व्यावसायिक संकुल तसेच वार्षिक भाडेपट्ट्यावर दिलेल्या दुकानांची इत्थंभूत माहिती जमा करून नगररचना विभाग, बाजार विभागाचा डाटा अपडेट केला जाणार आहे. याकरिता प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाने निविदा प्रकाशित केली आहे.शहरात महापालिकेच्या मालकीच्या विविध ठिकाणी जागा आहेत. यातील बहुतांश जागा अतिक्रमकांनी बळकावल्याचे चित्र आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर व्यावसायिक संकुलांची उभारणी करण्यात आली असून, यातील काही संकुल बीओटी तत्त्वावर आहेत, तसेच विविध ठिकाणी भाडेपट्ट्यावर दुकाने देण्यात आली आहेत. काही जागा उद्यानांसाठी राखीव होत्या. यातील बोटावर मोजता येणारे उद्यान वगळता इतर जागा अतिक्रमकांच्या ताब्यात आहेत. या सर्व जागांचे दस्तावेज नगररचना विभागात उपलब्ध असले तरी ते ऐन वेळेवर उपलब्ध होत नाहीत. शिवाय अनेक दस्तावेज जीर्ण झाले आहेत. दरम्यान, मनपाचे व्यावसायिक संकुल, भाडेपट्ट्यावर दिलेली दुकाने व दैनंदिन बाजार वसुलीच्या कामकाजाची जबाबदारी बाजार विभागाकडे आहे. दरवर्षी रेडीरेकनर नुसार होणारी भाडेवाढ, त्याची वसुली, दुकानांचे करार तसेच दैनंदिन वसुलीसाठी राबवली जाणारी तात्पुरती ढोबळ यंत्रणा पाहता नगररचना विभागासह बाजार विभागाचे संगणीकरण करण्याचा निर्णय महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी घेतला होता. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनीसुद्धा हिरवी झेंडी दिली होती. काळाची पावले ओळखून मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी या दोन्ही विभागाचा डाटा अपडेट क रण्यासाठी निविदा प्रकाशित केली आहे.‘डीपीआर’मध्ये काय असेल?मनपाच्या मालकीच्या सर्व जागा शोधून त्यांचे क्षेत्रफळ मोजणे, यापैकी खुल्या जागा, नियोजित प्रकल्पासाठी राखीव जागा किती असे वर्गीकरण करणे. मनपाच्या जागेवर उभारलेले उद्यान, त्यांची आजची स्थिती नमूद करण्याचा समावेश प्रकल्प अहवालात केला जाईल. यासाठी नगर रचना विभागाकडून माहिती जमा करून ती संगणीकृत केली जाणार आहे. याकरिता ‘जीआयएस’प्रणालीचा वापर केला जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका