शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल, ‘अमृत’च्या कामावर ‘डीपीसी’ सभा वादळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:27 IST

अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील घरकुलांच्या कामांसह अमृत योजनेंतर्गत कामात पाइप वापराच्या मुद्यावर शनिवारी जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा चांगलीच वादळी ठरली.

अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील घरकुलांच्या कामांसह अमृत योजनेंतर्गत कामात पाइप वापराच्या मुद्यावर शनिवारी जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा चांगलीच वादळी ठरली. तीन वर्षात शहरात केवळ २०० घरकुलांची कामे पूर्ण झाल्याने पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली. पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधिर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कलास पगारे, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर उपस्थित होते. एकीकडे प्रधानमंत्री आवास योजनेचा गाजावाजा करण्यात येत असताना अकोला शहरात गत तीन वर्षात केवळ २०० घरकुलांची कामे पूर्ण झाल्याचा मुद्दा आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी सभेत उपस्थित करीत, यासंदर्भात मनपा प्रशासनाला विचारणा केली. तीन घरकुलांच्या कामांची गती अशीच राहिल्यास शहरातील घरकुलांची कामे पूर्ण होण्यास २५ वर्षे लागतील, अशा शब्दात आ.बाजोरिया यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच खा.संजय धोत्रे, आ.रणधिर सावरकर यांनीही या मुद्दयावर नाराजी व्यक्त केली. तीन वर्षात केवळ २०० घरकुलांची कामे पूर्ण होणे ही बाब योग्य नसल्याचे सांगत यासंदर्भात संंबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिले. अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांत पाइप वापराचा मुद्दा नगरसेवक राजेश मिश्रा यांनी सभेत उपस्थित केला. अमृत योजनेच्या कामात वापरण्यात येत असलेले पाइप वापरता येत नाही, असे पत्र शासनामार्फत मनपाला प्राप्त झाले होते. त्यानंतर संबंधित पाइपचा वापर करता येतो, असे पत्र सचिवांकडून मनपाला प्राप्त झाले, असे सांगत यासंदर्भात मिश्रा यांनी आक्षेप घेतला, तसेच आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही या मुद्यावर आक्षेप घेत चौकशी करण्याची मागणी रेटून धरली.चौकशी करा; कंत्राटदाराचे देयक थांबवा : पालकमंत्र्यांचे निर्देश !अमृत योजनेंतर्गत कामात पाइपच्या वापरासंदर्भात पंधरा दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करा आणि तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे देयक थांबविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मनपा आयुक्तांना या सभेत दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयSanjay Dhotreसंजय धोत्रेDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील