शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी‘ निवडणूक : महापौरांसह १५ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:31 IST

अकोला :  जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह १४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.

ठळक मुद्देअर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह १४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र टापरे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘डीपीसी’च्या १४ जागांच्या निवडणुकीसाठी २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गत २ डिसेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी ७ डिसेंबर रोजी अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांच्यासह १४ उमेदवारांनी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र टापरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. ६ डिसेंबर रोजी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ‘डीपीसी’ १४ जागांच्या निवडणुकीसाठी ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची संख्या १५ वर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ८ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. त्यानुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांच्या संख्येत वाढ होणार आहे. 

मतदारसंघनिहाय असे दाखल झाले उमेदवारी अर्ज!‘डीपीसी’च्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघातून १४ उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये महानगरपालिका मतदारसंघात नागरिकांचा मागासवर्ग स्त्री प्रवर्गातून रंजना विंचनकर, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शारदा ढोरे, शीतल गायकवाड, अनुसूचित जाती (स्त्री) प्रवर्गातून आम्रपाली उपरवट, सर्वसाधारण प्रवर्गातून विजय अग्रवाल, राजेंद्र गिरी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून अनिल मुरुमकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपालिका मतदारसंघातून ओबीसी स्त्री प्रवर्गात  रेशमा अंजुम अफजलखॉ, गंगा चंदन, सर्वसाधारण प्रवर्गातून राजेश खारोडे व कैलास ढोकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातून सरला मेश्राम, अनुसूचित जमाती प्रवर्गातून श्रीकांत खोने व सर्वसाधारण प्रवर्गातून संजय आष्टीकर इत्यादी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरElectionनिवडणूक