शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय, सोन्याचे दागिने काढून हाकलून दिले! विवाहितेची तक्रार, पतीसह सासुविरूद्ध गुन्हा दाखल

By नितिन गव्हाळे | Updated: August 19, 2023 22:53 IST

Akola: पती व सासू चारित्र्यावर संशय घ्यायचे. माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा तगादा लावून छळ करायचे. पैसे न आणल्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढून पती व सासुने घरातून हाकलून दिले.

- नितीन गव्हाळेअकोला - पती व सासू चारित्र्यावर संशय घ्यायचे. माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा तगादा लावून छळ करायचे. पैसे न आणल्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढून पती व सासुने घरातून हाकलून दिले. याप्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी पती व सासुविरूद्ध गुन्हा दाखल केला.

सांगळूद येथील २५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न २०२० मध्ये संग्रामपूर येथील सुनिल रामभाऊ तळोकार यांच्यासोबत झाले. वडिलांनी लग्नामध्ये तीन लाख खर्च केला. लग्नानंतर आठ महिने चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पती चारित्र्यावर संशय घ्यायचा. दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करायचा. सासु मंदाबाई रामभाऊ तळोकारघरातील कामधंदा येत नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करायची. २०२१ मध्ये मुलगी झाल्यानंतर पती व सासू मुलगी पाहायला आले नाहीत. त्यानंतर विवाहिता सासरी गेल्यानंतर पती चारित्र्यावर संशय घ्यायचे आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावायचे. ६ एप्रिल २०२३ रोजी पती व सासूने विनाकारण वाद करून शिवीगाळ करून मारहाण केली आणि विवाहितेच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून घरातून हाकलून दिल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीतून केला आहे.

भरोसा सेलमध्ये तडजोडीचा प्रयत्नपती सुनिल तळोकार व सासू मंदाबाई हे सातत्याने चारित्र्यावर संशय घ्यायचे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावायचे. त्यामुळे विवाहितेने पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार दोन्ही कुटूंबांमध्ये समेट घडविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु तडजोड न झाल्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdowryहुंडा