शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, आराेग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

अकोला : पावसाळ्यात दूषित पाणी, अर्धवट शिजलेले अन्न व रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आदींमुळे पोटाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ...

अकोला : पावसाळ्यात दूषित पाणी, अर्धवट शिजलेले अन्न व रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आदींमुळे पोटाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हॉटेल उघडले तरी जिभेचे लाड नको, सकस व शक्यतो घरचेच ताजे अन्नपदार्थ सेवन करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे आहे. पावसाळ्यात दूषित पाण्याने अनेक आजार उद्भवतात. पावसाळा सक्रिय झाला आहे. सर्वत्र दमट हवा असते. यामुळे पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. अनेक दिवसांनंतर आता हॉटेल्सही उघडू लागली आहेत. मात्र, पावसाळ्यात पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात बाहेर खाणे टाळायला हवे. पावसाळ्यात पचनास हलका असा आहार घेणे अपेक्षित आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. तेव्हा सकस, शुद्ध, पोषक, घरचे अन्नच खावे.

विविध प्रकारच्या भाज्या, फळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत करतात. त्यामुळे त्याचे आहारातील प्रमाण वाढवावे.

मसाल्याचे पदार्थदेखील जसे की मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जिरे, लिंबू आदी पचन संस्था नीट काम करण्यासाठी मदत करतात.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

दूषित पाण्याची समस्या असल्याने पाणीपुरी, दहीपुरी आदी चटकदार पदार्थ खाणे टाळावे.

कृत्रिम रंगाने बनविलेले पदार्थ, चायनीज पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

कार्बनेटेड पेयांमुळे शरीरातील मिनिरल्स कमी होतात तसेच शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमता मंदावते. यामुळे अपचन होऊ शकते.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. बॅक्टेरिया, विषाणूचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. पदार्थ बनविण्यासाठी अनेकदा शुद्ध पाणी नसते, गाळलेले किंवा उकळलेले पाणी नसते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या अन्नावर माशा बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवत असल्याने रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.

हॉटेलमध्ये एकदाच घेतलेल्या तेलाचा वारंवार वापर होतो. हे तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय, अशा पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. विविध प्रकारच्या डाळी, फळांचे प्रमाण वाढवावे. पचनास हलके अन्न घ्यावे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी.

- मुक्ता बगडिया, आहारतज्ज्ञ, अकोला