शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो घाबरू नका....कोरोना रुग्णांसाठी २६०० पेक्षा अधिक खाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:53 IST

सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल २६६९ खाटांची व्यवस्था असल्याची माहिती समोर आली आहे.

- अतुल जयस्वालअकोला : जिल्ह्यात कोरोना अनियंत्रित झाला असून, या संसर्गजन्य आजाराचा विळखा घट्ट होत आहे. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा प्रथमच हजाराचा टप्पा पार करत ११२४ वर पोहोचला असून, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पृष्ठभूमीवर आरोग्य सज्जतेचा आढावा घेतला असता, सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल २६६९ खाटांची व्यवस्था असल्याची माहिती समोर आली आहे.‘अनलॉक-४’ अंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असून, अनेक क्षेत्र खुली झाली आहेत. आंतरजिल्हा बससेवाही सुुरू झाली असून, नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. यामुळे संपर्कातून संसर्ग वाढला असून, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज शंभराच्या घरात रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी प्रथमच अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हजाराच्यावर गेला. जिल्ह्यात आतापर्यंत ४९२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, सध्या ११२४ रुग्ण विविध ठिकाणी भरती आहेत. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण एकट्या सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णही येत आहेत. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांसाठी व्यवस्था केली असून, जिल्ह्यात सर्वोपचार रुग्णालय, दोन खासगी रुग्णालये, १७ कोविड केअर सेंटर्स व सात कोविड समर्पित आरोग्य केंद्रांमध्ये २६६९ खाटा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आणखी १५० खाटा वाढणारकोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आणखी १५० खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला शहरातील राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय येथे १०० खाटांचे कोविड केअर सेंटर होणार असून, येत्या आठवडाभरात उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून हे सेंटर रुग्णसेवेत येणार आहे. याशिवाय मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय येथेही आणखी ५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.आॅक्सिजन सुविधेच्या ३५० खाटागंभीर रुग्णांची निकड लक्षात घेता जिल्ह्यात सात कोविड समर्पित आरोग्य केंद्रांमध्ये ३५० खाटा आॅक्सिजन सुविधेसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला