शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोणी घर देता का घर; ७६ वर्षीय वृद्ध महिलेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 10:26 IST

वयोवृद्ध महिलेवर घर शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

-आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत चालला असताना दुसरीकडे गुलजारपुरा भागातील एका ७६ वर्षीय वयोवृद्ध महिलेला नातेवाइकांनी घराच्या बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘लॉकडाउन’च्या काळात घरातील कर्त्या पुरुषांवर बेरोजगार होण्याची वेळ आल्याने संबंधित वृद्ध महिलेला घरातून बाहेर काढण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे या वयोवृद्ध महिलेवर घर शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.कोरोनामुळे सद्यस्थितीमध्ये शहरातील चारही झोनमधील विविध प्रभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. अशा संकटाच्या समयी गरजू व निराधार लोकांसाठी अकोलेकर धावून गेले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी संयमाने व एकदिलाने मुकाबला करण्याची गरज असताना ‘लॉकडाउन’च्या काळात रोजगार बंद झाल्याने घरातील वयोवृद्ध नागरिकांना घराबाहेर काढून दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जुने शहरातील गुलजारपुरा परिसरात आपल्या नातेवाइकांकडे आश्रित म्हणून राहणाऱ्या ७६ वर्षीय मरियमबी यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यांचा ४५ वर्षीय रिक्षा चालक मुलगाही बेघर आहे. आई एका नातेवाइकाकडे आश्रयाला होती. त्यामुळे त्याच्यावर आईचा भार नव्हता; मात्र आता आईसुद्धा बेघर झालयाने या दोघा माय-लेकांवर उघड्यावर राहण्याची परिस्थिती ओढवली आहे. यादरम्यान त्यांनी भाडेतत्त्वावर घराचा शोध सुरू केला असला तरी कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे त्यांना कोणी घर देत नसल्याची भावना त्यांनी जड अंत:करणाने व्यक्त केली.

मुलगा रिक्षा चालक; व्यवसाय ठप्पमरियमबी यांचा ४५ वर्षीय मुलगा करीम खान रिक्षा चालवून पोटाची खळगी भरतो. गत २३ मार्चपासून टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे व्यवसाय ठप्प पडल्याचे करीम खान याने सांगितले. शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी दोघे माय-लेक राहतात. दानशूर व्यक्तींनी जेवण आणून दिले तर जेवतात, नाहीतर पाणी पिऊन पोटाची आग शांत करतात.मनपाच्या बेघर निवाºयाकडे फिरविली पाठमनपाच्यावतीने शहरात उघड्यावर राहणाºया बेघर व्यक्तींसाठी जिल्हा सत्र न्यायालयासमोरील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सहा येथे तसेच अकोट फैल पोलीस स्टेशनलगत मनपा मराठी मुलांची शाळा येथे निवारा उघडण्यात आला आहे. या बेघर निवाºयात आम्ही गेलो होतो. आता पुन्हा जाणार नाही, असे सांगत मनपाच्या निवाºयाबद्दल फार काही बोलण्यास मरियमबी यांनी नकार दिला.

 

टॅग्स :Akolaअकोला