शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मोबाइल कंपन्यांनी सादर केले दस्तऐवज; मनपा करणार पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:37 IST

या कागदपत्रांची प्रशासकीय स्तरावर अतिशय बारकाईने पडताळणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत शहरात अनधिकृतपणे फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाऱ्या विविध मोबाइल कंपन्यांनी परवानगीचे दस्तऐवज सादरच केले नाहीत. यापैकी काही नामवंत व मोठ्या कंपन्यांनी शुक्रवारी सायंकाळी परवानगीसह नकाशा व इतर दस्तऐवज बांधकाम विभागाकडे सादर केले. या कागदपत्रांची प्रशासकीय स्तरावर अतिशय बारकाईने पडताळणी केली जाणार असल्याची माहिती आहे.मनपा प्रशासनाची दिशाभूल करीत शहराच्या विविध भागात खोदकाम करून फोर-जी सुविधेसाठी काही मोबाइल कंपन्या अनधिकृतपणे फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रस्ते, जलवाहिन्यांची तोडफोड केल्यानंतरही ‘रिस्टोरेशन चार्ज’ जमा करण्यास हात आखडता घेणाºया कंपन्यांनी मनपाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्देशानुसार १६ जानेवारी रोजी आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात आली . या बैठकीत देशातील नामवंत कंपनीने शहरात थोड्याफार ठिकाणी अनधिकृत केबल टाकल्याची बाब मान्य केली. असे असले तरी मनपाने दिलेल्या परवानगीसह नकाशा व शुल्क जमा करण्याच्या पावत्या आदी कागदपत्रे सादर करण्यास अपयशी ठरले होते. शुक्रवारी सायंकाळी नामवंत कंपन्यांसह इतर मोबाइल कंपन्यांनी मनपाच्या बांधकाम विभागात विविध कागदपत्रे सादर केल्याची माहिती आहे. या कागदपत्रांची प्रशासनाच्या स्तरावर बारकाईने पडताळणी केली जाणार आहे.

टॉवरची दिली माहिती पण...शहरात विविध मोबाइल कंपन्यांनी मनपाच्या परवानगीशिवाय टॉवरची उभारणी केली. त्याबदल्यात मनपाकडे कोणतेही शुल्क किंवा कर जमा केला नसल्याचे समोर आल्यानंतर नगररचना विभाग, मालमत्ता कर विभागाने तपासणी केली असता, २२८ पैकी चक्क २२० टॉवरला परवानगीच नसल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी संबंधित मोबाइल कंपन्यांनी इत्थंभूत माहिती सादर करणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक अर्धवट माहिती सादर केल्याचे दिसून आले. यामध्ये कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी न करताच केवळ टॉवरची संख्या असलेली यादी सादर केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.‘टॉवर’च्या संख्येत तफावत का?मनपाकडे मोबाइल टॉवरची यादी सादर करणाºया कंपन्यांची यादी व प्रशासनाच्या दप्तरी असलेल्या टॉवरच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली आहे. बहुतांश कंपनीच्या याद्यांचे प्राथमिक अवलोकन केले असता, यादीमध्ये तब्बल २८ ते ३० मोबाइल टॉवरची तफावत असल्याची माहिती आहे.

विधिज्ञांचे मत घेणार!मोबाइल कंपन्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर निष्कर्षाअंती दोषी आढळून येणाºया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या विरोधात फौजदारी तक्रार नोंदविली जाणार आहे. त्यासाठी मनपाकडून शहरातील ज्येष्ठ विधिज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका