शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणे अधिक सोयीचे व्हावे याकरिता परिवहन विभागाने ऑनलाईन पद्धत अंमलात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणे अधिक सोयीचे व्हावे याकरिता परिवहन विभागाने ऑनलाईन पद्धत अंमलात आणली आहे. घरबसल्या ऑनलाईन लायसन्स काढले जात असून, वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांचेच ऑनलाईन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धती अमलात आणली आहे. दैनंदिन सरासरी ६० ते ७० ऑनलाईन लर्निंग लायसन्स दिले जातात. त्यासाठी ऑनलाईन अपाईंमेंट घेणेही आवश्यक आहे़ त्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्यात येते़

लर्निंग लायसन्स ऑनलाईन !

सारथी पोर्टलवर जाऊन उमेदवारांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेले नियमानुसार शुल्क भरून ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेऊन लर्निंग ऑनलाईन लायसन्स काढता येते. दैनंदिन सरासरी ६० ते ७० लर्निंग लायसन्स दिले.

१८ वर्षांनंतर मिळते लायसन्स

वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी संबंधित उमेदवाराने वयाचे १८ वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. १८ वर्षांनंतर कुणीही लायसन्स काढू शकतो. वाहन चालविण्याकरिता उमेदवार फिट असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले असणे आवश्यक आहे.

एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार

वयाच्या चाळिशीनंतर लायसन्स काढण्याकरता एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार असल्याचे पत्र परिवहन विभागाने आरटीओला पाठविले आहे. आरटीओकडे इच्छुक डॉक्टरांनी संपर्क केला तर त्यांना आरटीओच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र देण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. एका डॉक्टराला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार आहेत.

आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढता येणार आहे. वयाच्या चाळिशीनंतर एमबीबीएस डॉक्टरांचे तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र लायसन्स काढताना बंधनकारक लागणार आहे. दिवसाला सरासरी ६० ते ७० ऑनलाईन लर्निंग लायसन्स दिले जातात. - ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला