शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...अन् रुग्णसेवा देतानाच डॉक्टरांची प्रकृती बिघडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:57 IST

रुग्णसेवा देताना एका वैद्यकीय अधिकाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात घडला.

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगशास्त्र विभागाचा भार केवळ दोन डॉक्टरांवर आला आहे. रुग्णसेवेचा अतिरिक्त बोझा अन् प्रशासनाच्या अजब अटींमुळे वैद्यकीय अधिकारी मानसिक तणावात काम करत आहेत. अशातच रुग्णसेवा देताना एका वैद्यकीय अधिकाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात घडला.चार महिन्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन केल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगशास्त्र विभागातील सात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा एकाच वेळी थांबविण्यात आली. सातही डॉक्टर एकाच विभागातील असल्याने येथील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. विभागात केवळ दोनच निवासी डॉक्टर शिल्लक राहणार असून, त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभागासह अस्थिव्यंग वार्डातील ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा भार आला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना थेट नागपूरला रेफर केले जात आहे. दरम्यान, शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रुग्णसेवा देताना डॉ. अनुराग गुप्ता यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांना विचारले असता, हा प्रकार त्यांना माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.सरकारी डॉक्टरांवर खासगीत उपचारसर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा देताना अचानक प्रकृती बिघडल्याने डॉ. गुप्ता यांच्यावर तत्काळ खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. डॉ. गुप्ता हे स्वत: शासकीय रुग्णालयात सेवा देत असून, त्यांनाच येथे उपचार मिळत नसेल, तर सर्वसामान्य रुग्णांवर काय उपचार होत असेल, हादेखील संशोधनाचाच विषय आहे.प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही मानसिक ताण!सर्वोपचार रुग्णालयाचा बहुतांश कारभार हा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे. निवासी डॉक्टरांची सेवा अचानक थांबवणे, सेवेत कायम राहण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या जाचक अटी अन् वाढती रुग्णसंख्या यामुळे डॉक्टरांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही बसत आहे.

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला