शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका! -  रावसाहेब दानवे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:59 IST

देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

अकोला: सत्तेच्या उण्यापुऱ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत भाजपाने देशात विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली. देशात जातीयवादाला थारा न दिल्यामुळेच जातीय दंगली भडकल्या नाहीत, याची पुरेपूर जाण सर्वसामान्य जनतेला आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. विकास कामांच्या बळावरच देशात पुन्हा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.रामदासपेठस्थित मराठा मंडळ मंगल कार्यालयात भाजपाच्या निवडणूक संचालन समिती आघाडी प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात होते तर व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, खा. अ‍ॅड. संजय धोत्रे, ना. डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, आ. हरीश पिंपळे, माजी आ. विजयराव जाधव, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, उपमहापौर वैशाली शेळके आदी विराजमान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकास कामांची काँग्रेससह विरोधकांनी धास्ती घेतली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने देशाला अस्थिर करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर मात करण्यासाठी पक्ष संघटन महत्त्वाचे असून, सर्वांनी एकदिलाने काम करा, देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा