शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुबार पेरणीचे पंचनामे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:29 IST

पालकमंत्र्यांचे निर्देश : मूर्तिजापूर येथे कृषी समाधान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: शेतीच्या चांगल्या उत्पादक क्षमतेसाठी सर्व शेतींची मृदा आरोग्य पत्रिका काढली जाईल. कृषी औजरांसाठी यांत्रिकी बँक स्थापन केली जाईल. पीक विम्याची भरपाई न करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली जाईल. शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून खडीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दुबार पेरणीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. मूर्तिजापूर येथे आज आयोजित कृषी समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी आमदार हरीश पिंपळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भय्यासाहेब तिडके, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळे आदींसह सर्व कृषी विभागासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपले जीवन सुखी करावे. शेतकऱ्यांच्या अन्य अडचणीही प्राधान्याने सोडविल्या जातील. शेतकऱ्यांचे समाधान हेच शासनाचे ध्येय आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यात प्रथमच अकोला जिल्ह्यात कृषी समाधान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुबार पेरणीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना निश्चितपणे अर्थसाह्य दिले जाईल. मागील वर्षी पीक विम्याचे पैसे न देणाऱ्या कंपनीच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जातील. जलयुक्तच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी स्वामी समर्थ शेतकरी स्वयंम सहायता शेतकरी बचतगटाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीला ११ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. शेतकरी आत्महत्याग्रस्त बेबीनंदा विश्वनाथ राऊत यांना धनादेश देण्यात आला. शिबिरात एकूण ९५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय डागा, कमलाकर गावंडे, नारायण भटकर, भारत भगत, राजेंद्र हंडे, संतोष सारडा, संतोष शर्मा, आरिफभाई, राहुल पाटील, राजू नासणे, राजू सरदार, दिग्विजय गाडेकर, गजानन नाकट, संदीप जळमकर, राहुल गुल्हाने, सचिन देशमुख, हर्षल साबळे, अविनाश यावले, रितीष शाबसकर, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.